लातूर काँग्रेस काडून वरिष्ठ नेते आणि विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांचा सलग दुसऱ्यांदा फोटो डावलणे ही अमित देशमुखांची मर्जी की पदाधिकाऱ्यांची मस्ती!

महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) – लातूर जिल्हा काँग्रेस डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष आणि निरीक्षक निलंगा विधानसभा डॉ. अरविंद भातांब्रे यांनी आयोजित केलेल्या जन आक्रोश आंदोलनाच्या बॅनरवरून कॉग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा फोटो नव्हता, ही बाब संविधान आणि पक्षातील वरिष्ठाना

योग्य मान – सन्मान देण्याचा काँग्रेस पक्षाचा इतिहास असताना लातूर काँग्रेस काडून विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांचा फोटो डावलण्याची ही दुसरी घटना आहे हे विशेष, लातूरचे सुपुत्र स्व. विलासराव देशमुख यांनी एक सुसंस्कृत राजकारणाची परंमपरा घालून दिली आहे. मात्र ही परंमपरा माजी मंत्री अमित देशमुख यांच्या नेतृत्वातील

लातूर जिल्हा काँग्रेस काडून मोडल्याचे दिसून येत आहे. राज्यच्या राजकारणात काँग्रेसच्या प्रमुख पाहिल्या फळीतील नेत्यामधील नेत्याचा आणि संविधानिक पद असलेले विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांचा सलग दुसऱ्यांदा फोटो डावलने हे काँग्रेस मधील दुसऱ्या फळीतील प्रमुख तरुण नेते असलेले अमित देशमुख यांना

भविष्यात त्रास दायक होणार यात शंका नाही! आणि अमित देशमुखांना अडचणीत आणण्याचे काम लातूर जिल्ह्यातील काँग्रेस सेलचे आणि निरीक्षक डॉ. अरविंद भातांब्रे आयोजित कालच्या शेतकऱ्यांच्या संकटात काँग्रेस मैदानात असा नारा देत भरपावसात भिजत निलंगा छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे जन आक्रोश

आंदोलनाच्या बॅनर वर विजय वडेट्टीवर यांचा फोटो न घेता डॉ.अरविंद भातांब्रे यांनी केले. या आधी लातूर लोकसभा निरीक्षक आमदार संग्राम थोपटे यांच्या पहिल्या दौऱ्याच्या कार्यक्रमात आणि पत्रकार परिषदेत विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांचा फोटो नव्हता तेव्हा अमित देशमुखांना पत्रकारांनी या बाबद प्रश्न विचारला असता

तेव्हा अमित देशमुखांनी प्रश्न टळला होता. पण आता सलग दुसऱ्यांदा विरोधी पक्ष नेत्यांचा फोटो डावलने हा पहिल्या फळीतील आणि विरोधी पक्ष नेत्याला मान देण्यात अमित देशमुख यांची लातूर काँग्रेस कमी पडली हे मात्र खर आहे! या फोटो डावलन्याच्या प्रकरणावरून महाराष्ट्र खाकीने सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस

शिवानी वडेट्टीवार यांना प्रश्न विचारला असता त्यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही! यावरून हे स्पस्ट होत आहे की हे फोटो डावळणे सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस शिवानी वडेट्टीवार यांना ही आवडले नसावे!

Recent Posts