Sambhaji bhide संभाजी भिडे यांच्या वादग्रस्त वाक्‍तव्याची चौकशी करून त्यांच्यावर त्वरीत देशद्रोही कायद्याखाली कार्यवाही झाली पाहिजे – माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर  

महाराष्ट्र खाकी (लातूर / प्रतिनिधी ) – राष्ट्रपिता महात्मा गांधी हे देशाचे राष्ट्रपिता आहेत. स्वातंत्र्याच्या इतिहासात महानायक म्हणून त्यांच्याकडे बघीतले जाते. अशा महात्म्याबद्दल गलिच्छ वक्‍तव्य करून संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची बदनामी करण्याचे काम सुरू केलेले आहे. त्यामुळे त्यांनी केलेल्या वादग्रस्त वाक्‍तव्याची

चौकशी करून त्यांच्यावर त्वरीत देशद्रोही कायद्याखाली कार्यवाही झाली पाहिजे, अशी प्रतिक्रिया भाजपा नेते तथा किसान मोर्चा गोवा राज्याचे प्रभारी माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी दिली आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी हे कोण्या एका  पक्षाचे नेते नव्हते तर संपूर्ण भारतीयांचे व जगातील अन्यायाविरूध्द लढणारे महात्मा होते. अशा

महात्म्याविरूध्द भिडेच काय कोणीच असे वक्‍तव्य करू नये, अशा महात्म्या विरूध्द असे अपशब्द वापरणे हे अत्यंत किळसवाने विचार आहेत. भिडे हे भाजपाच्या कुठल्याही कार्यकारी समितीत नसताना विरोधी पक्ष मात्र या वक्‍तव्याला  राजकीय वळण देण्याचे काम करीत आहेत. परंतु सरकारने मात्र याबाबत भूमिका स्पष्ट केली

असून भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल केलेल्या गलिच्छ वक्‍तव्याची चौकशी करून त्यांच्यावर तत्काळ कार्यवाही करण्याची घोषणा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे आणि ती योग्यच आहे. असेही माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर म्हणाले.

Recent Posts