महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) – लातूर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांची ओळख एक कडक आणि शिस्तप्रिय IPS अधिकारी म्हणून आहे. गडचिरोली येथील केलेल्या धाडसी कारवायांची भारत सरकारने दाखल घेऊन राष्ट्रपती यांच्या हस्ते शौर्य पदकाने सन्मानित करण्यात आले होते. सोमय मुंडे यांच्या शिस्तप्रिय
कर्तव्याची कार्यपद्धती रेणापूर येथील खून प्रकरणात दिसून आली, सावकारीच्या पैशासाठी अमानुषपणे मारहान करुन एका मागासवर्गीय तरुणाचा खुन केल्याची घटना रेणापूर येथे घडली होती. या घटनेची गंभीर दखल घेऊन लातूर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी रेणापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक यांच्या सह दोघांच्या
बदल्या आणि तिघांना निलंबित केले आहे. चार दिवसांपूर्वी रेणापूर येथील मातंग समाजाचा तरुण गिरीधर तपघाले यांचा सावकाराच्या पैशांवरुन दोघांनी बेदम मारहान करित खुन केल्याची घटना घडली होती. दरम्यान, या घटनेच्या आठ दिवस आदी मयत तरुणांनी व त्यांच्या कुटूंबियांना संबंधीत सावकारांकडून येत असलेल्या घमक्यांसंदर्भात
रेणापूर पोलिसांकडे तक्रार केली होती. परंतू, रेणापूर पोलिसांकडून या संदर्भात कोणतीही पावले उचलण्यात आलेली नसल्याचा आरोप मयत तपघाले यांच्या कटंबियानी केला होता. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता आणि रेणापूर पोलीस स्टेशनच्या पोलीस अधिकारी यांच्या कर्तव्यात केलेला निष्काळजीपणा लक्षात घेऊन लातूर
पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी रेणापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक दिपक शिंदे यांची बदली नियंत्रण कक्षात केली तर अन्य दोघांची बदली पोलीस मुख्यालयात करण्यात आली आहे. तसेच, रेणापूर पोलीस स्टेशन येथील सहायक पोलीस उपनिरिक्षक कन्हेरे, पोलीस कर्मचारी घाडगे आणि हुंडेकरी यांना निलंबीत करण्यात आले आहे.