लातूर मधील अनधिकृत खासगी सावकारी जोमात, रेणापूरात एक बळी गेला, कारवाईसाठी प्रशासनाला किती बळी पाहिजे ?

महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप ) – रेणापूर शहरातील गिरीधारी तपघाले यांचा व्याजाच्या पैशाच्या कारणावरून झालेल्या मारहाणीमुळे मृत्यू झाला. या प्रकरणामुळे जिल्ह्यातील अनधिकृत खासगी सावकारीचा गंभीर प्रश्न प्रशासना समोर निर्माण झाला आहे. लातूर जिल्ह्यात शहरी आणि ग्रामीण भागात व्याजाने पैसे

देण्या – घेण्याचा व्यवसाय जोरात सुरू आहे. या खासगी सावकारामध्ये काही सरकारी नौकरदार आहेत. हे सरकारी कर्मचारी जिल्हा परिषद, कलेक्टर ऑफिस, शिक्षक पण आहेत फक्त ते समोर येऊन हा खासगी सावकारी व्यवसाय करत नाहीत नावाला कोणाला तरी पुढे करून हा खासगी व्यवसाय सुरु आहे. घरगुती अडचण सांगून अनेक जण

सावकारांकडून कर्ज घेतल आहेत. यात दवाखाना, मुलांचे शिक्षण, लग्न आणि ईतर कार्यासाठी कर्ज घेण्याचे प्रमाण अधिक आहे. लातूर जिल्ह्यात विशेषतः ग्रामीण भागात अनधिकृत खासगी सावकारी व्यवसाय करण्याचा कोणताही कायदेशीर परवाना नसताना बिनधास्त सावकारी चालू आहे. गरज सरेल म्हणून धुणीभांडी

करणार्‍या बाईपासून ते अनेक व्यापारी खासगी सावकाराकडून व्यजने पैसे घेतात. मात्र त्यांच्या व्याजाचा दणका इतका असतो की कर्जदार त्यातच रूतत जातात. शेवटी कर्ज फिटत नाही आणि सावकाराचा तगादाही संपत नाही. एक हजार रुपयांपासून लाखो रुपयांपर्यंत सावकाराकडून महिन्याकाठी 5 टक्के, दहा टक्के, 15

टक्के, 20 टक्के, 30 टक्के दराने कर्ज घेतात. ज्या दिवशी कर्ज घेतले जाते तेव्हापासून पुढील महिन्यातील तारखेला न चुकता ठरलेले व्याज सावकारांना द्यावे लागते. व्याजाची रक्कम चुकली की त्यावर व्याजाला व्याज लावले जाते. इतकेच काय तर लातूर येथील गंज गोलाई, दयानंद गेट येथील किरकोळ भाजी -पाला, फळ विक्रेत्याला सकाळी पाचशे

रूपये व्यवसायाला दिले की रात्री व्यवसाय संपल्यावर त्याच्याकडून सहाशे रूपये गोळा करणारे अनधिकृत खासगी सावकार आहेत. या अनधिकृत खासगी सावकारांवर कसलीच कारवाई होताना दिसत नाही, ना जिल्हा उपनिबंधक ना पोलीस प्रशासन या अनधिकृत सावकारांवर कधी कारवाई करेल असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Recent Posts