लातूर मार्केट कमिटीच्या माध्यमातून शेतकर्‍यांवरील अन्याय दूर करून त्यांना न्याय देण्याचे काम केले – माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर

महाराष्ट्र खाकी ( लातूर / प्रतिनिधी ) – लातूर बाजार समितीच्या सभापती पदावर काम करताना शेतकरी, व्यापारी, हमाल, मापाडी यांना केंद्रबिंदू ठेवून बाजार समितीचा चौफेर विकास करण्याचे काम केले. हमाल मापाडींना राहण्यासाठी श्री.गौरीशंकर गृहनिर्माण संस्था उभारून साडेचार हजारामध्ये जागा व घर देण्याचे काम

केले. त्या जागेची किंमत आज दहा लक्ष रूपये आहे. भूकंपग्रस्तांना अनुदान देण्याचे कामही केले. याबरोबरच लातूर बाजार समितीबरोबरच मूरूड, रेणापूर व पानगाव उपबाजार पेठ उभारण्याचे कामही आपल्याच कालावधीत झालेले आहे. तसेच शेतकर्‍यांचा मुलगा शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून शेतकर्‍यांच्या मुलासाठी राज्यातील

पहिल मोफत वसतिगृह उभारण्याचे काम आपण बाजार समितीच्या माध्यमातून केले असून याचे उद्घाटन तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार व सहकारमंत्री विलासराव देशमुख यांच्याहस्ते करण्यात आले. याचा अनेक शेतकरी मुलांना फायदा होत आहे. असे प्रतिपादन भाजपा नेते तथा किसान मोर्चा गोवा राज्याचे प्रभारी माजी

आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी केले. यावेळी ते राज्याचे माजी कामगार कल्याण मंत्री आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या मार्गदर्शनाखालील छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी, व्यापारी, हमाल, गाडीवान परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ हरंगुळ (बु) व हरंगुळ (खु)  येथे आयोजित प्रचारसभेत बोलत होते.

यावेळी या प्रचार सभेला भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सूर्यकांतराव शेळके, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष निळकंठराव पवार, बाबूराव वाघमारे पाटील, ग्रामपंचायत सदस्य सतीश सुरकुटे, भाजपाचे शहर जिल्हा उपाध्यक्ष चद्रकांत खटके, नरसिंग इंगळे, महादेव गायकवाड, युवराज वीर, बब्रूवान पवार, अंगद जाधव, उध्दव जाधव,

सुकुमारताई तळणे, काशीनाथ पांचाळ, बाबूराव कोतवाड, विनोद जटाळ, राजू गुरमे, गणेश कैले, मिराताई माळी आदी मान्यवर उपस्थित होते तर हरंगुळ (खु) येथील प्रचार सभेला केदार पाटील, प्रकाश पाटील, शिवाजी बोमणे, तानाजी झुंजे, गजेंद्र पाटील, सूर्यकांत काळदाते, नागझरी येथील काशीनाथ स्वामी, प्रकाश सरवदे, उपसरपंच गफार

पटेल, बिभिषण पांडे, दत्ता पवार, सदाशीव स्वामी, प्रमोद घोडके, अमिर पटेल, तानाजी पाटील, सचिन स्वामी यांच्यासह मान्यवर उपस्थित होेते. यावेळी पुढे बोलताना माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर म्हणाले, लातूर मार्केट कमिटीच्या माध्यमातून शेतकर्‍यांवरील अन्याय दूर करून त्यांना न्याय देण्याचे काम आपण केलेले आहे. मी

सभापती पदावर आलो तेव्हा लातूर बाजार समितीचे उत्पन्‍न 22 लाख रूपये होते तर माझा कार्यकाल पूर्ण झाल्यांनतर हे उत्पन्‍न साडेआठ कोटीवर गेले होते. मार्केट यार्डातील पाच हजार हमाल, मापाडी यांच्या सोयीसाठी माथाडी बोर्ड लागू करून त्यांच्या खात्यावर 80 कोटी रूपये जमा करण्याचे काम केलेले आहे. या निधीतून

हमाल मापाड्यांचा पगार व त्यांना दिवाळी बोनस देण्याचे कामही आपण केलेले आहे.   यापुढील कालावधीतही लातूर मार्केट कमिटीचा चेहरा बदलण्याचे काम करू असेे मतही त्यांनी यावेळी बोलताना माजी आ.कव्हेकरांनी व्यक्‍त केले. प्रचार सभेचे प्रास्ताविक राजाभाऊ गुरमे यांनी केले तर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार गणेश सगर

यांनी मानले. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख मान्यवरांचा सत्कार संयोजन समितीच्यावतीने करण्यात आला. या प्रचारसभेला विविध ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य, सोसायटीचे सदस्य यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Recent Posts