महाराष्ट्र खाकी (लातूर / प्रतिनिधी) – राज्यात कृषी बाजार समितीच्या निवडूकीचे वारे चालू आहे. लातूर बाजार समितीचीही निवडणूकीचा प्रचार चालू आहे. लातूरचे माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर यांचे चिरंजीव लातूर मनपाचे माजी नगरसेवक अजित पाटील कव्हेकर भाजपा कडून छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी,
व्यापारी, हमाल, मापाडी परिवर्तन पॅनल निवडणुकीचा प्रचार चालू आहे. पॅनलच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ तांदूळजा व भिसेवाघोली येथे आयोजित प्रचारसभेत अजित पाटील कव्हेकर बोलत होते साडेसहा वर्ष सभापती पदावर असताना आपले नेते माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर साहेबांनी शेतकरी, व्यापारी, हमाल, मापाडी,
गाडीवान यांच्या हक्कासाठी लढा देऊन योग्य ते न्याय देण्याचे केलेले आहे. लातूर बाजार समितीच्या माध्यमातून शेतकर्यांच्या मुलांसाठी दोनशे विद्यार्थ्यांचे मोफत वसतिगृह, शेतकर्यांच्या मालाला योग्य भाव, माथाडी कामगारांसाठी संघटना उभी करून माथाडी कामागारांच्या हितासाठी माथाडी बोर्ड लागू करण्याचे काम केलेले आहे.
परंतु त्यानंतर 29 वर्ष सत्तेत राहूनही सत्ताधार्यांनी मार्केट यार्डातील रस्ते, कचरा व नाल्याचेही दूरूस्ती केलेली नाही परिणामी दूर्गंधीच्या वातावरणात हमाल, माथाडी, कामगारांना काम करावे लागत आहे. त्यामुळे शेतकरी, व्यापारी, हमाल, गाडीवान यांच्या सन्मानासाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी, व्यापारी, हमाल, गाडीवान
परिवर्तन पॅनलच्या पाठिशी सक्षमपणे उभे रहा असे आवाहन ग्रामपंचायत सर्वसाधारण गटातील उमेदवार तथा भाजपा युवा नेते अजित पाटील कव्हेकर यांनी केले आहे.