राजकारण

Amit deshmukh लोकसेवा आणि सुसंस्कृत राजकारणाचा वारसा समर्थपणे चालविणारे माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख

महाराष्ट्र खाकी ( लातूर – पांडुरंग कोळगे ) – पुरोगामी विचारांच्या प्रगत महाराष्ट्रात सध्या राजकीय अस्थिरतेचे वातावरण आहे. सर्वत्र साशंकतेचीस्थिती आहे. त्यामुळे थोडेही विचलित न होता, समय सुचकता दाखवीत प्रतीकात्मक शब्दात “कितीही वादळे आणि कितीही वारे आले तरी बाभळगावचा वाडा हा आहे तिथेच राहणार असे ठामपणे सांगुन आपली भूमिका स्पष्ट करणारे काँग्रेस पक्षाचे प्रगल्भ युवा नेतृत्व माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांचा आज वाढदिवस आहे, त्यांना दीर्घायुरारोग्य लाभो ही मन:पूर्वक शुभेच्छा.बाभळगावच्या

वड्याला लोकसेवेचा मोठा वारसा आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री लोकनेते आदरणीय विलासरावजी देशमुख, माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी बाभळगावच्या याच वड्यातून आपल्या राजकारण आणि समाजकारणाची सुरुवात केली. त्यांचाच वारसा पुढील पिढीत माजी मंत्री, आमदार अमित देशमुख व आमदार धीरज देशमुख समर्थपणे सांभाळत आहेत. वैक्तिक स्वार्थ आणि प्रतिष्ठेसाठी नव्हे तर समाजकारणासाठी राजकारण हा बाभळगावच्या वाड्याचा वारसा असल्यामुळे येथे घराणेशाहीचा गंध येत नाही. त्यामुळेच हा वाडा तत्कालीक

वादळवाऱ्यांच्या संकटाने विचलित होत नाही. हे आमदार अमित विलासराव देशमुख यांनी आपल्या खानदानी शैलीत सांगून टाकले आहे. त्यामुळे त्यांच्या विचाराची आणि कार्याची दिशा स्पष्ट झाली असून त्यांचे नेतृत्व उजळून निघाले आहे. केवळ राजकीय वारसा आहे म्हणून या क्षेत्रात टिकता येत नाही, याची जाणीव असलेल्या आमदार अमित विलासराव देशमुख यांनी प्रारंभी आपले शिक्षण पूर्ण करुन समाजकार्याला सुरुवात केलेली आहे. इंजिनीअरिंगमध्ये शिक्षण घेतल्यानंतर समाजकारण आणि राजकारण येण्यासाठीची आपली योग्यता सिध्द

करण्यासाठी त्यांनी प्रारंभी लोकांच्या समस्या, अडचणी समजून घेतल्या. सन 1998-99 च्या दरम्यान विधानसभा निवडणुकीतील काँग्रेस पक्षाच्या प्रचाराची पुर्वतयारी करताना त्यांनी लातूर व परिसरात लोकांशी संवाद साधला, त्या काळात आदरणीय विलासराव देशमुख यांच्या प्रयत्नांतून उभा राहिलेला मांजरा सहकारी साखर कारखाना मराठवाडा विभागात यशस्वी वाटचाल करीत होता. या कारखान्यामुळे ऊसाला चांगला भाव मिळत असल्याने या परिसरात उसाची लागवड मोठया प्रमाणात झाली होती. त्यामुळे अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण होऊन

शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते. शेतकऱ्यांची समस्या लक्षात घेऊन या युवा नेतृत्वाने नवीन साखर कारखाना उभारण्याचे आश्वासन दिले. तेव्हाच्या सर्वात तरुण संचालक मंडळाने फक्त 9 महिन्यांत साखर कारखान्याची उभारणी केली. फक्त कारखाना उभा करुनच हे संचालक मंडळ थांबले नाही तर मांजरा कारखान्याचे अनुकरण करीत तेव्हाचा विकास आणि आजचा विकास साखर कारखाना देशात आदर्श ठरला. या एका कारखान्याचे आज दोन कारखाने झाले असून मागच्या वर्षात ऊसविकास आणि तांत्रिक कार्यक्षमतेत हे

कारखाने राज्यात अव्वल ठरले आहेत. आजवर राज्य आणि देश पातळीवरील जवळपास 60 पारितोषिके या कारखान्यांनी मिळविली आहेत. मागच्या गळीत हंगामात ऊसाला मराठवाडयात सर्वाधिक भाव देण्याचा विक्रमही याच कारखान्याच्या नावावर नोंदवला गेला आहे.
विलास साखर कारखान्याची यशस्वी वाटचाल सुरू असतांना देशातील सर्वात अद्यावत तंत्रज्ञानावर आधारीत “टवेन्टीवन’ हा कारखाना आमदार अमित देशमुख यांच्या पुढाकारातून लातूर तालुक्यात मळवटी येथे उभारला असून मागच्या गळीत हंगामात तब्बल 12 लाख टन उसाचे

गाळप या कारखान्यात करुन पुन्हा एकदा अतिरिक्त ऊसाच्या समस्येवर मात केली आहे. साखर कारखानदारीतून जिल्हयात आर्थिक परिवर्तन घडवीत असतानाच आमदार अमित देशमुख यांनी सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातही भरीव योगदान दिले आहे. शेतकरी तसेच गरीब, मजूर यांच्या मुलांना व्यवसायीक आणि उद्योजक बनण्यासाठी त्यांनी विलास को-ऑप बँकेची स्थापना केली. या बँकेच्या माध्यमातून अनेक सुशिक्षित बेरोजगार तरुण आज स्वत:च्या पायावर उभा राहिले असून इतर अनेक हातांना ते काम देत आहेत. आपल्या

भागातील नव्या पिढीला अद्यावत शिक्षण मिळावे म्हणून मांजरा चॅरिटेबल ट्रस्टबरोबरच विलासराव देशमुख फाऊंडेशनच्या माध्यमातून त्यांनी प्रयत्न चालविले आहेत. समाजकारणाबरोबर राजकारणात प्रवेश केल्यानंतर आपल्या सोबत असलेल्या सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्यांना विविध पदा वर काम करता यावे म्हणून आमदार अमित देशमुख यांनी प्रयत्न केले. निवडणूक काळात नेत्याच्या प्रचारात झोकून देऊन काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना उमेदवारी देऊन त्यांना निवडून आणणे आणि त्यांना पदाधिकारी बनवण्याचा त्यांनी आनंद घेतला.

सामान्य कार्यकर्त्यांना संधी देण्याचा त्यांच्या धोरणामुळे नगर परिषद, महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, बाजार समिती, बँका तसेच मांजरा परिवारातील साखर कारखान्यावर तळागाळातील कार्यकर्त्यांना पदाधिकारी होण्याची संधी मिळाली. प्रारंभी विलासराव देशमुख युवा मंचच्या माध्यमातून सामाजिक कार्य त्यानंतर साखर कारखाना बँकेची स्थापना करुन परिसराच्या आर्थिक परिवर्तनासाठी प्रयत्न केले आणि त्यानंतर राजकारणात प्रवेश करुन सामान्य कार्यकर्त्यांना विविध पदावर काम करण्याची संधी दिली.एवढे सर्व करुन

स्वत:च्या राजकीय पाया मजबूत केल्यानंतर आमदार अमित देशमुख यांनी सन 2009 विधानसभेची निवडणूक लढविली आणि मोठया मताधिक्याने जिंकली. त्यांच्या या विजयात कौटुंबिक पुण्याईचा जरुर वाटा आहे, परंतु या क्षेत्रात अगोदर बरीच वर्ष उमेदवारी केल्यामुळे घराणेशाहीचा शिक्का त्यांच्या नेतृत्वावर बसत नाही. आमदार म्हणून विधानसभेत त्यांची राजकीय कारकीर्द बहरत असतानाच त्यांच्यावर कौटुंबिक आघात झाला, तत्कालीन केंद्रीय मंत्री आदरणीय विलासराव देशमुख यांचे निधन झाले. या आघातानंतर डगमगुन न जाता कुटुंबाचा

वारसा त्यांनी समर्थपणे सांभाळला. या आघातानंतर धीरगंभीर झालेल्या आमदार अमित देशमुख यांनी जिल्हयातील सर्वच संस्थाच्या कारभारावर लक्ष केंद्रित करुन त्या लोकाभिमूख कशा राहतील हे पाहिले. आदरणीय दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व संस्थांचा कारभार उत्तम चालेल याचे नियोजन त्यांनी केले आणि त्याची यशस्वी अंमलबजावणी केली. सन 2014 साली त्यांना राज्यमंत्रिपदी काम करण्याची संधी मिळाली तेव्हा त्यांनी या संधीचे सोने करीत आपल्या कर्तृत्वाची चुणूक राज्याला दाखवून दिली. राज्यमंत्री म्हणून

मिळलेल्या जेमतेम 100 दिवसाच्या कार्यकाळात त्यांनी आपल्या लातूर मतदारसंघात शेकडो कोटींच्या योजना राबवल्या. “जे जे नव ते लातूला हवं’ हे धोरण पुढ चालवत मतदारांचा विश्वास संपादन केला. या जोरावर त्यांनी सन 2019 ची विधानसभा निवडणूक सहज जिंकून विजयाची हॅट्रीक साधली. या निवडणुकीनंतर राज्यात अनपेक्षित घडामोडी घडून, काँग्रेस-राष्टÅवादी-शिवसेना या तीन पक्षाचे सरकार स्थापन झाले. या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आमदार अमित विलासराव देशमुख यांना कॅबिनेट मंत्री म्हणुन काम करण्याची संधी मिळाली. या

संधीचे अक्षरश: त्यांनी सोने करुन दाखविले आहे. उच्च शिक्षित व्यक्तीला त्याच्या योग्यतेनुसार संधी किंवा मंत्रीपद मिळाले तर त्या पदाला कसा न्याय मिळतो हे आमदार अमित देशमुख यांचा कारभार पाहिल्यानंतर लक्षात येते आहे. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर 4 महिन्यातच संपूर्ण जगावर कोरोना महामारीचे संकट कोसळले. कोरोनाविरुध्दचे हे युध्द जिंकण्यासाठी महाराष्ट्राच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने जी कामगिरी केली आहे तिला तोड नाही. आमदार अमित देशमुख यांनी प्रसिध्दीपेक्षा कामाला महत्त्व देत या कोरोना काळात

अहोरात्र परिश्रम घेतले. वैद्यकिय शिक्षण विभागाचे मुख्य कार्य हे शिक्षण देणे आणि संशोधनाचे असले तरी कोरोना काळात या विभागाने रुग्णांवरील उपचाराला प्राधान्य दिले.
कोरोना महामारी सुरु झाली तेव्हा यासंबधीची तपासणी करणाऱ्या राज्यात फक्त 3 प्रयोगशाळा होत्या. वैद्यकिय शिक्षण विभागाने या संदर्भात तातडीने निर्णय घेऊन या प्रयोगशाळांची संख्या 1000 पर्यत वाढविली. फक्त महाविद्यालयातील प्रयोगशाळांत 6 कोटी लोकांची तपासणी केली. सर्व महाविद्यालयांच्या ठिकाणी मिळून 20 समर्पित् रुग्णालये उभारली. 8 हजार ऑक्सीजनचे तर

3 हजार व्हेंटीलेटरचे बेड निर्माण करुन आय.सी.यु. कक्षाची उभारणी केली. ऑक्सिजनचा पुरवठा कमी होऊ लागला तेव्हा वैदयकीय महाविदयालयात जवळपास 80 ऑक्सीजन प्लांट उभे केले. म्युकरमायकोसिसचा उद्रेक झाल्यानंतर सर्व ठिकाणी त्यासाठी वेगळे कक्ष उभा केले. जवळपास 2500 पेक्षा जास्त शस्त्रक्रिया केल्या आहेत.
आर्युवेदिक, युनानी, होमिओपॅथी रुग्णालयांतही कोरोना रुग्णांवर उपचार केले. एवढेच नव्हे तर राज्यातील सर्व खाजगी रुग्णांलयांना तज्ञ डॉक्टर आणि प्रशिक्षित मनुष्यबळ वैद्यकिय शिक्षण विभागाने पुरवले. यासाठी

वेळोवेळी आमदार अमित देशमुख यांनी महत्त्वाचे निर्णय घेतले. हाफकिनमार्फत सर्व रुग्णांलयाना वेळेत औषध पुरवठा होईल याची दक्षता घेतली. भविष्यात असे संकट निर्माण होऊ नये म्हणून हाफकिन मार्फत लस उत्पादन करण्याचा निर्णय घेऊन त्या दिशेने कामही सुरु केले आहे.
वैद्यकिय शिक्षण अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी असलेला 70:30 कोटा रदद करुन राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार प्रवेश देण्याचा निर्णय अमित देशमुख यांनी आपल्या मंत्री पदाच्या कार्यकाळात घेतला आहे. या निर्णयामुळे मराठवाडा, विदर्भातील विद्यार्थ्यांवर होणारा

अन्याय दूर झाला असून सर्वाधिक फायदा लातूरच्या विद्यार्थ्यांना झाला आहे. सन 2020 – 21 वर्षात एस.ई.बी.सी. आणि ई.डब्लु.एस. आरक्षणामुळे बाधीत होऊन खाजगी महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची फीस शासनामार्फत भरण्याचा निर्ण्य त्यांनी घेतला. छत्रपती शाहु महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती तसेच डॉ. पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता योजना त्यांनी सुरु केली. वैद्यकिय शिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांचे तसेच पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वेतनात अमित देशमुख यांनी मंत्री म्हणून भरघोस वाढ

केली. डॉक्टर व परिचारीकांच्या मानधनातही त्यांनी वाढ केली. जिल्हा तेथे वैद्यकिय महाविद्यालय सामान्य रुग्णांना अद्यावत उपचार सुविधा उपलब्ध व्हाव्यात त्याचबरोबर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना वैद्यकिय शिक्षण घेता यावे यासाठी प्रत्येक जिल्हयाच्या ठिकाणी वैद्यकिय महाविद्यालय सुरु करण्याचा निर्णयही त्यांच्याच कार्यकाळात झाला आहे. या निर्णयानुसार मुंबई महानगर, रायगड, सिंधुदुर्ग, नंदूरबार, सातारा, बारामती, उस्मानाबाद, परभणी येथे नव्याने वैद्यकिय महाविद्यालये सुरु झाली आहेत. नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान

विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर शिक्षण संकुले आणि रुग्णांलये सुरु करण्याचा निर्णयही त्यांनीच घेतला आहे.
वैद्यकिय शिक्षण विभागाप्रमाणेच सांस्कृतिक कार्य विभागातही त्यांनी अनेक बदल करुन धाडसी निर्णय घेतले आहेत. महाराष्ट्राच्या संस्कृतीचे जतन व संवर्धन करण्यासाठी नवीन सांस्कृतिक धोरण तयार करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. हे धोरण आता अंतिम टप्यात आहे. राज्यातील कलाकारांचे सर्व्हेक्षण करुन त्यांना त्या-त्या जिल्हयात करिअर घडविण्याच्या संधी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. ऐतिहासीक वारसा जतन

करण्यासाठीही त्यांनी ऐतिहासीक निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी केली आहे. वैद्यकिय शिक्षण, सांस्कृतिक कार्य विभागाचा कार्यभार सांभाळत असतानाच लातूर जिल्हयाचे पालकमंत्री म्हणुनही अमित देशमुख यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. कोरोना काळात लातूर मुख्यालयी थांबून त्यांनी संपूर्ण जिल्हयातील जनतेची काळजी घेतली आणि खऱ्या अर्थाने पालकत्व निभावले. कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठीच्या सुविधा उभारत असतानाच कोरोनाचा प्रादुभाव वाढूच नये यासाठी त्यांनी विशेष मोहिमा राबविल्या. लातूर येथील सुपरस्पेशालिटी

रुग्णांलयात तातडीने 224 कोटी खर्चाच्या सुविधा उभारुन येथे गंभीर रुग्णांवर तातडीने उपचार केले. त्यामुळे जिल्हयात मृत्यूचे प्रमाण अत्यल्प राहिले. समाजकल्याण विभागाच्या सुसज्ज वसतिगृहात कोवीड सेंटर उभारुन प्रत्येक रुग्णांना उपचार मिळेल यांची दक्षता घेतली. या महामारीच्या काळात जिल्हयातील एकही व्यक्ती उपाशी राहु नये म्हणुन 22 लाख लोकांपर्यत अन्न-धान्य पुरविले. कोरोनाची लागण झालेल्या जिल्हयातील प्रत्येक रुग्णाना स्वत:च्या कार्यालयातून दूरध्वनी करुन त्यांच्या अडी-अडचणी विचारल्या आणि त्या अडचणी दूरही

केल्या. कोरोना प्रादुभावाचा काळ असूनही जिल्हयातील विकासप्रक्रिया थांबणार नाही याची दक्षता पालकमंत्री म्हणुन अमित देशमुख यांनी घेतली. 2019 ते 2022 या वर्षात् जिल्हयातील प्रमुख विकास योजनांसाठी 5 हजार कोंटीपेक्षाही अधिकचा निधी मंजूर करुन त्या योजनांची अंमलबजावणी सुरु केली आहे. लातूर येथील विभागीय सारथी कार्यालयासाठी पदभरती मंजूर करुन घेऊन या कार्यालयामार्फत वसतिगृह, ग्रंथालय, प्रशिक्षण केंद्र व इतर सुविधा उभारणीसाठी जागा उपलब्ध करुन हे काम मार्गी लावले आहे. एकंदरीत आपल्या सार्वजनिक जीवनाची

सुरुवात केल्यानंतर जवळपास 25 वर्षाच्या कार्यकाळात आमदार अमित विलासराव देशमुख यांनी त्यांना मिळालेला लोकसेवेचा वारसा समर्थपणे सांभाळला असल्याचे दिसून येत आहे. लातूर पासून सुरु झालेल्या त्यांच्या नेतृत्वाच्या प्रवासाने आज संपूर्ण महाराष्ट व्यापला असून देशभरात त्यांच्या कार्याची दखल घेतली जात आहे. त्यांचे हे कार्य दिवसेंदिवस वाढत जाऊन त्यांच्या नेतृत्वाला कायम झळाळी मिळत राहो ही त्यांच्या वाढदिवसानिमित्त मन:पूर्वक शुभेच्छा.

Most Popular

To Top