महाराष्ट्र

Latur news लातूर जिल्ह्यातील 54 हजार 205 शेतकरी कुटुंबांना आता अन्नधान्याऐवजी DBT द्वारे बँक खात्यात जमा होणार पैसे

महाराष्ट्र खाकी ( लातूर / प्रतिनिधी ) – शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासनाने राज्यातील 14 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेत समाविष्ट नसलेल्या केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना तांदूळ तीन रुपये व गहू दोन रुपये प्रतिकिलो दराने वाटप करण्याचा निर्णय घेतला होता. लातूर जिल्ह्याचाही यामध्ये समावेश आहे.

आता या केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी कुटुंबातील प्रतिलाभार्थी, प्रतिवर्षी एक हजार 800 रुपये प्रमाणे रक्कम थेट दरमहा बँक खात्यात वितरीत केली जाणार आहे. लातूर जिल्ह्यात केशरी (एपीएल) शिधापत्रिकाधारक शेतकरी कुटुंब संख्या 54 हजार 205 इतकी आहे. यामध्ये अहमदपूर तालुक्यातील

5 हजार 983, औसा तालुक्यातील 9 हजार 354, चाकूर तालुक्यातील 5 हजार 406, देवणी तालुक्यातील 2 हजार 727, जळकोट तालुक्यातील एक हजार 730, लातूर तालुक्यातील 6 हजार 744, निलंगा तालुक्यातील 10 हजार 938, रेणापूर तालुक्यातील 5 हजार 556, शिरूर अनंतपाळ तालुक्यातील 2 हजार 921 आणि उदगीर

तालुक्यातील 2 हजार 846 शेतकरी कुटुंबांचा समावेश आहे. लातूर जिल्ह्यातील जवळपास 2 लक्ष 55 हजार व्यक्तींच्या खात्यावर या योजनेतून रोख रक्कम जमा होणार आहे.

Most Popular

To Top