महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) – लातूर जिल्हा IMA आणि ऑफिसर क्लब यांच्या वतीने ‘IMA मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेमध्ये स्पर्धकांचा उत्साह वाढवण्यासाठी झुम्बा डान्सचे देखील आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, यावेळीरा ज्य विक्रीकर औरंगाबाद विभागाचे सहआयुक्त जी श्रीकांत आणि माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांचा नवीन
अंदाज पाहायला मिळाला. जी श्रीकांत आणि विक्रांत गोजमगुंडे यांचा आपल्या खास अंदाजमध्ये भन्नाट झुम्बा डान्स पाहायला मिळाला. त्यांनी केलेल्या या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणत व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, कशा प्रकारे जी श्रीकांत आणि विक्रांत गोजमगुंडे हे मोठ्या उत्साहाने डान्स करत आहेत . या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये
लातूरचे प्रतिष्ठित डॉक्टर, व्यापारी, तरुणांनी आणि नागरिकांनी सहभाग घेतला होता. तर स्पर्धेच्या सुरुवातीला आमदार अभिमन्यू पवार, माजी मंत्री संजय बनसोडे उपस्तित होते. जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी पी, पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या सहभागमुळे नागरिकांमध्येही उत्साह पाहायला मिळाला.
सर्धेचे पारितोषिक वितरण माजी पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.