विधान परिषद निवडणुकीत 5 पैकी 3 जागांवर मविआच्या विजयाने अमित देशमुखांचा काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना जोमाने कामाला लागण्याचे आवाहन

महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) – राज्यात 5 जागांवर झालेल्या विधान परिषद निवडणुकीत  महाविकास आघाडीची सरशी झाली आहे. 5 पैकी 3 जागांवर महाविकास आघाडीने, एका जागेवर भाजपने तर एका जागेवर अपक्षाने बाजी मारली आहे. विधान परिषद निवडणुकीतून बुद्धीजीवी नागरीकांचा कौल कोणत्या दिशेने आहे, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे काँग्रेस

पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे, असे आवाहन माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी लातूर काँग्रेस भवन येथे, पक्षाच्या विविध सेलचे अध्यक्ष आणि नवनियुक्त प्रभाग अध्यक्ष यांच्या संयुक्त आढावा बैठकीदरम्यान बोलताना केले आहे. राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्य मंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार अमित देशमुख यांनी

शुक्रवार दि. 3 फेब्रुवारी रोजी सकाळी लातूर शहरातील काँग्रेस भवन येथे काँग्रेस पक्षाचे नवनियुक्त प्रभाग अध्यक्ष तसेच विविध विभाग अध्यक्षांची संयुक्त बैठक घेऊन एकूण कामकाजाचा आढावा घेतला. काँग्रेस पक्षाने आपल्या सर्वांवर महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे, त्यामुळे शहरातील प्रत्येक घरापर्यंत पक्षाचा कार्यक्रम आणि विचार पोहोचवावा जनतेच्या अडीअडचणी समजून घेऊन त्या

तातडीने सोडवण्यासाठी कार्यवाही करावी असे आवाहन यावेळी त्यांनी केले. काँग्रेस पक्षाच्या विभागाचे अध्यक्ष आदी उपस्थित होते. यावेळी बोलतांना माजी मंत्री, आमदार अमित देशमुख म्हणाले की, देशात व राज्यातील वातावरण आपणा सर्वांना माहिती आहे. प्रभाग अध्यक्ष हे महत्त्वाचे पद आहे, पक्षाच्या कोणत्याही अध्यक्षाला अनन्यसाधारण महत्व असते. प्रभाग अध्यक्ष ते राष्ट्रीय

अध्यक्ष एक साखळी आहे पक्षाला दिशा देण्याचे पक्ष तळागाळात मजबूत करण्याचे हे पद आहे. पक्ष बांधणी करणे काँग्रेसचा विचार घराघरात पोहोचवणे हे प्रभाग अध्यक्षांचे काम आहे. त्यांनी प्रभागात बूथ कमिटी, प्रभाग कमिटी तयार करावी, प्रत्येक प्रभागात काँग्रेस भवनची एक शाखा तयार करावी, तेथेच प्रभागातील नागरिकांच्या समस्या सूटतील, तसेच त्या ठिकाणी केंद्र राज्याच्या

शासकीय योजनाची माहिती ही त्या कार्यालयात असावी , विधान परिषदेच्या लागलेल्या निकालातून बुद्धीजीवी मतदारांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी केले आहे, ही बदलती हवा आहे. मनपा, विधानसभा, लोकसभा निवडणुका या लागोपाठ येतील. लातूर शहर जिल्हा काँग्रेसने एनएसयुआय, ग्राहक संघटना, घरेलू कामगार संघटना यांच्या नेमणुका केलेल्या

नाहीत, त्या कराव्यात. काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सतत दक्ष राहिले पाहिजे, सामाजिक प्रश्न आंदोलने करून सोडवली पाहिजेत, तसेच महिना व पंधरा दिवसाला पदाधिकाऱ्यांच्या बैठका झाल्या पाहिजेत, त्यात राष्ट्रीय ते गल्लीतील मुद्द्यावर सुद्धा चर्चा केली पाहिजे सर्व फ्रंटल अध्यक्षांनी ही प्रभागात जाऊन काम करावे असे सांगून त्यांनी नवनियुक्त काँग्रेस पक्षाच्या सर्व प्रभाग अध्यक्षांचे अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Recent Posts