युवा नेते अजित पाटील कव्हेकर यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) – धर्मवीर छत्रपती संभाजी राजे यांच्या विरोधातील वादग्रस्त वक्‍तव्याबद्दल लातूर शहरात भाजपा युवा मोर्चा चे जिल्हा अध्यक्ष तथा युवा नेते अजित पाटील यांच्या नेतृत्वात माजी उपमुख्यमंतरी तथा विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून निषेध नोंदवला. राज्याचे विरोधी पक्ष (ajit pawar) नेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजित

पवार यांनी महाराष्ट्राचे दैवत, हिंदू धर्मियांचे श्रद्धास्थान धर्मवीर छत्रपती श्री.संभाजी महाराज यांच्याबद्दल अतिशय घृणास्पद व्यक्तव्य केले. धर्मवीर छत्रपती श्री.संभाजी (ajit pawar) महाराज यांना धर्मवीर म्हणण्याची गरज नाही असे अतिशय अपमानास्पद व खालच्या दर्जाचे व्यक्तव्य केले. असे वादग्रस्त वक्‍तव्य करून तमाम हिंदू बांधवांच्या भावना दुखावलेल्या आहेत. छत्रपती संभाजी राजेंच्या

धर्मनिष्ठेवर बोट ठेवत त्यांच्या धर्मवीर उपाधीलाच आपल्या राजकीय फायद्यासाठी जाणीवपूर्वक विरोध करण्याचे
काम विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी केलेले आहे. त्यामुळे लातूर भाजपाचे युवा नेते तथा भाजपा युवा मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांच्या नेतृत्वाखाली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या

प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून व त्यांच्या निषेधार्थ घोषणाबाजी करीत तीव्र निषेध व्यक्‍त करण्यात आला. यावेळी या आंदोलनाला भाजपा युवा मोर्चाचे सरचिटणीस अ‍ॅड. गणेश गोमजगुंडे, संतोष ठाकूर, सागर घोडके, जिल्हा उपाध्यक्ष गजेंद्र बोकण, विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजेश पवार, युवती आघाडी प्रमुख पुनम पांचाळ, मंडलाध्यक्ष अ‍ॅड.हरिकेष पांचाळ, कार्यालय प्रमुख

आकाश बजाज, सोशल मिडीया जिल्हा संयोजक आकाश जाधव, चिटणीस संतोष तिवारी, राहूल भूतडा, सुनिल राठी, आदित्य फफागिरे, आकाश जाधव, महादेव पिटले, ईश्‍वर सातपुते, आकाश पिटले, शुभम माळवदे, गौरव यादव, अभिजीत शिंदे, निखील शेटकार, कृष्णा सारगे, सुरज शिंदे, प्रेम चव्हाण, अजय जाधव, ओम ढेकरे, गणेश धोत्रे, गौरव यादव, यश इटकर, प्रशांत कालापुरे आदीसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Recent Posts