देवणी शिवारात विनापरवाना देशीदारूची अवैध विक्री करणाऱ्या पांडुरंगाच्या LCB ने आवळल्या मुसक्या

महाराष्ट्र खाकी ( देवणी / विवेक जगताप ) – लातूर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी लातूर जिल्हा पोलिसांची सूत्र हातात घेतल्यापासून लातूर जिल्ह्यातील अवैधरीत्या चालणारे धंदे व बेकायदेशीर दारू विकणारे यांच्यावर कारवाईचा धडाका चालूच आहे. पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, निलंगा उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिनेश

कोल्हे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे (LCB) पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांच्या नेतृत्वात विविध पथके तयार करण्यात आले होते. दि. 24/12/2022 रोजी पथकास मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे देवणी पोलीस स्टेशन हद्दीत विनापरवाना देशीदारूची अवैध विक्री/व्यवसाय करण्यासाठी वलांडी शिवारातून टाटा सुमो वाहना मधून

देशीदारूची वाहतूक होत असताना LCB पथकाने सापळा लावून छापा मारला तेथे देशीदारूचे 1536 बाटल्या किंमती-1,07,520/- रूपयेची बेकायदेशररित्या देशी दारू आणि एक टाटा सुमो वाहन असा एकूण 4,07,520/- रुपयेचा देशीदारूचा मुद्देमाल बेकायदेशीररित्या वाहतूक करीत असताना पांडुरंग शिवाजी बिराजदार, वय 40 वर्ष ,राहणार इस्लामवाडी, तालुका देवनी जिल्हा लातूर हा

आरोपी सापडला या आरोपीच्या विरुद्ध देवणी पोलीस स्टेशन येथे गुन्हा नंबर 305/2022 कलम 65 (अ)(ई) महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि या गुन्ह्याचा तपास देवणी पोलीस करत आहेत. ही कारवाई वरिष्ठाचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे (LCB) पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांचे नेतृत्वात , पोलीस अंमलदार सचिन मुंडे ,बालाजी जाधव, रवि कानगुले यांनी केली आहे.

Recent Posts