महाराष्ट्र खाकी ( गडचिरोली / विवेक जगताप ) – गडचिरोली जिल्ह्यात पारंपारिक शेती सोबतच शिकार करण्यासाठी तसेच वन्य प्राण्यांपासुन संरक्षणासाठी अनेक सामान्य नागरिक बंदुका बाळगत असतात. अशा वडीलोपार्जित बंदुका व शस्त्रे जिल्ह्रातील नागरिकांकडे उपलब्ध असलेल्या बंदुका व शस्त्रेचा नक्षलवादी गैरफायदा घेतात या वर उपाय म्हणून गडचिरोली पोलीस अधीक्षक निलोत्पल यांचे
संकल्पनेतुन नक्षलवाद्यांच्या पिएलजीए (PLGA) सप्ताहाच्या पाश्र्वभुमीवर नागरिकांनी स्वत:जवळ बाळगलेल्या बंदुका स्वेच्छेने जवळच्या पोलीस स्टेशनच्या स्वाधिन कराव्यात असे आवाहन करण्यात आले होते .या आव्हानाला गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातील अनेक गावकर्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत संपूर्ण
जिल्हयातील नागरिकांकडुन 68 भरमार बंदुका व 12
बॅरल गडचिरोली पोलीसांचे स्वाधिन केले . उप पोलीस स्टेशन दामरंचा 20 भरमार, उपपोस्टे रेपनपल्ली 05 भरमार, पोलीस स्टेशन जिमलगट्टा 02, उप पोलीस स्टेशन पेरमिली 15 भरमार व 03 बॅरल, पोलीस स्टेशन मुलचेरा 02 भरमार, उप पोलीस स्टेशन राजाराम (खां.) 12 भरमार व 9 बॅरल, उपविभाग पेंढरी कॅम्प कारवाफा अंतर्गत 08 भरमार, पोमके गोडलवाही 04 भरमार स्वाधिन करण्यात आल्या