महाराष्ट्र खाकी (लातूर / प्रतिनिधी ) – लातूर शहरातील झाडांचे प्रमाण सध्या जे वाढलेले दिसत आहे.यात डॉ. पवन लड्डा यांच्या ग्रीन लातूर वृक्ष टिमचे खूप मोठे योगदान राहिले आहे. ग्रीन लातूर वृक्ष टीमद्वारे मागील 1285 दिवस अविरतपणे कार्य करून लातूर शहरात लाखो झाडे लावण्यात आली. या लावलेल्या झाडांचे संगोपणाचे कार्य नियमितपणे सुरू असते. लातूर शहरातील
झाडांचे प्रमाण वाढले आहे, शहर हिरवेगार दिसत आहे .
पण काही विकृत लोकांकडून सातत्याने झाडांची नासधूससुरू आहे, झाडे तोडणे, झाडांखाली हेतुपूर्वक कचरा पेटवून देणे, विनाकारण झाडांच्या फांद्या तोडणे. आणि हा प्रकार सातत्याने वाढत आहे. दोन दिवसांपूर्वी विलासराव देशमुख मार्गावरील सात झाडांखाली मुद्दामहून कचरा पेटवून दिला जेणेकरून ती झाडे जळून जावी व सात
मोठी झाडे जळून गेली. काल उद्योग भवन परिसरात
मोठ्या पिंपळाच्या वृक्षाखाली कचरा पेटवून दिला त्यामुळेते झाड अर्धे जळाले. वृक्ष तोड, झाडांखाली कचरा जाळूनझाडांना हानी पोहनचविणे या बाबी सातत्याने महानगरपालिका आयुक्त, उपायुक्त यांच्या निदर्शनास आणूनही ,विभागीय आयुक्त औरंगाबाद येथे तक्रार करूनही संबंधिताकडून दखल घेतली जात नव्हती. यामुळे ग्रीन लातूर वृक्ष
टीम सदस्यांनी जाळलेल्या झाडासमोर अर्धनग्न होऊन निषेध व्यक्त केला. महानगरपालिका ने शहरात वृक्ष समिती , वृक्ष प्राधिकरण स्थापन करावे त्यांच्या बैठका घ्याव्यात, बगीचा कर्मचारी संख्या वाढवावी, झाडे तोडणाऱ्याव झाडे जाळणाऱ्या संबंधीत लोकांवर कारवाई करावी अशी मागणी ग्रीन लातूर वृक्ष टीमचे डॉ. पवन लड्डा, डॉ. भास्करराव बोरगावकर, पदमाकर बागल, सुलेखा
कारेपूरकर, आकाश सावंत, मनीषा कोकणे, नागसेन कांबळे, अविनाश मंत्री, सिताराम कंजे इत्यादींनी केली आहे.यानंतर योग्य कारवाई न झाल्यास व वृक्ष तोड, झाड जाळणे असे प्रकार झाल्यास झाडांना भावपूर्ण श्रद्धांजली, झाडांची शवयात्रा अशा पद्धतीने आंदोलन करून निषेध नोंदविण्यात येईल.