IPS niketan kadam सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या कडून 27 लाख 80 हजाराचा गुटखा जप्त करून 11 आरोपी विरोधात 04 गुन्हे दाखल

महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) – लातूर जिल्ह्यात गुटखा विक्री जोरात चालू आहे हे जिल्ह्यातील कुठल्याही टपरीवर गेले की दिसून येते. मात्र जिल्ह्यात मोठ्या कारवाया फक्त रेणापूर, चाकूर आणि अहमदपूर या भागात दिसून येत आहेत. या कारवाया फक्त सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या मुळे होत आहेत अशा चर्चा नागरिक करत आहेत आणि निकेतन कदम

आणि त्यांच्या टिमचे कौतुक करत आहेत. निकेतन कदम यांनी पदभार स्विकारल्या पासून त्याच्याकडून अशा कारवाया होत असताना दिसून येत आहेत. लातूर जिल्ह्यातील चाकूर व अहमदपूर उपविभागीय पोलिस अधिकारी सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांनी अहमदपूर पोलीस स्टेशन,चाकूर पोलीस स्टेशन आणि अहमदपूर तसेच लातूर येथील दंगल नियंत्रण पथकातील

पोलीस अंमलदार अशा एकूण 25 पोलीस अधिकारी व अंमलदारांचे वेगवेगळी पथके तयार करून अहमदपूर पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंद्याची माहिती काढून त्यावर कारवाई करण्याची मोहीम राबवित आहेत . या मोहिमेत पोलीस पथकास खात्रीशीर माहिती मिळाली की, अहमदपूर शहर व परिसरातील काही इसम प्रतिबंधित गुटका व सुगंधित तंबाखूची चोरटी  विक्री व्यवसाय करीत

आहेत आणि साठवणूक करीत आहेत. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने माहितीची शाहनिशा करून सहाय्यक पोलिस अधीक्षक निकेतन कदम यांच्या नेतृत्वात पोलिस अधिकारी व अमलदारांच्या पथकांनी एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणी छापा मारून 6 इसमांना ताब्यात घेऊन त्यांच्या कडून महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेले वेगवेगळ्या कंपनीचे,महाराष्ट्र राज्यामध्ये विक्रीसाठी

प्रतिबंधित असलेले  गुटका व सुगंधित पानमसाला असा एकूण 27 लाख 80 हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटका व सुगंधित पान मसाला तंबाखू जप्त करण्यात आले आहे. सहाय्यक आयुक्त कार्यालय, लातूर येथील अन्न सुरक्षा अधिकारी विठ्ठल लोंढे यांचे तक्रारीवरून पोलीस ठाणे अहमदपूर येथे प्रतिबंधित गुटका व सुगंधित तंबाखूची अवैद्य साठवणूक करून विक्री व्यवसाय करणारे इसम

नामे 1) परवेज इस्माईल शेख, वय 36 वर्ष, राहणार काळेगाव रोड अहमदपूर,2) अयाज इस्माईल शेख, राहणार कमला नेहरू शाळेच्या बाजूला अहमदपूर 3) गौस तांबोळी,राहणार अंबाजोगाई रोड, अहमदपूर, 4) इब्राहिम तांबोळी,राहणार अंबाजोगाई रोड अहमदपूर, 5) निसार बीस्ता सर्व राहणार अंबाजोगाई रोड अहमदपूर,6)बाळू मुंडे, राहणार भाग्यनगर अहमदपूर, 7)राजू हामने, राहणार

भाग्यनगर अहमदपूर, 8) जावेद शेख,राहणार भाग्यनगर अहमदपूर,9) आसद तांबोळी राहणार अहमदपूर 10) सय्यद इब्राहिम, राहणार अहमदपूर,11) इसाक शेख , राहणार अहमदपूर या आरोपी विरुद्ध अहमदपूर पोलीस स्टेशन येथे 1) गुन्हा रजिस्टर क्रमांक 533/ 2022, कलम 328,188, 272, 273 भा.द.वि. तसेच अन्नसुरक्षा आणि मानके अधिनियम 2006 कलम-59, 2) गुन्हा रजिस्टर

क्रमांक 534/ 2022, कलम 328,188, 272, 273 भा.द.वि. तसेच अन्नसुरक्षा आणि मानके अधिनियम 2006 कलम-59, 3) गुन्हा रजिस्टर क्रमांक 535/ 2022, कलम 328,188, 272, 273 भा.द.वि. तसेच अन्नसुरक्षा आणि मानके अधिनियम 2006 कलम-59, 4) गुन्हा रजिस्टर क्रमांक 536/ 2022, कलम 328,188, 272, 273 भा.द.वि. तसेच अन्नसुरक्षा आणि मानके

अधिनियम 2006 कलम- 59 याप्रमाणे 04 गुन्हे दाखल करून  27 लाख 80 हजार 485 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व पान मसाल्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वरील आरोपी पैकी 6 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे आणि इतर 5 आरोपी फरार आहेत. त्यांचा शोध पोलीस घेत आहे. गुन्ह्याचा पुढील तपास अहमदपूर पोलीस स्टेशनचे पोलीस करीत आहेत. हि कामगिरी

वरिष्ठांचे मार्गदर्शनात, सहायक पोलिस अधीक्षक निकेतन कदम, यांचे नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक दूरपडे, पोलीस उपनिरीक्षक रोकडे, उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय चाकूर,अहमदपूर तसेच पोलीस स्टेशन चाकूर,अहमदपूर येथील पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच लातूर येथील दंगल नियंत्रण पथकातील जवानांनी पार पाडली.

Recent Posts