महाराष्ट्र

लातूर मधील गुटखाकिंगच्या प्रेमाने गुटखा विक्री होत असलेल्या केंद्रावर कारवाई कधी ?

महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) – लातूर जिल्ह्यात आणि शहरात आजपर्यंत गुटखा विक्रीतील बड्या व्यापाऱ्यांना अन्न औषध प्रशासनाचे आणि पोलीस दलातील बडे अधिकारी का पकडू शकत नाहीत ?. जिल्ह्यातील आणि लातूर शहरातील दोन -तिन बडे गुटखाकिंग गुटखा विक्री करीत असल्याची खुलेआम चर्चा असताना लातूर मधील बडे व्यापारी कुणाच्या आशीर्वादाने

इतकी मोठी गुटखा विक्री करत आहेत .शासनाने गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी घातलेली असतानाही लातूर जिल्ह्यात कोणाच्या आशीर्वादाने व सहकार्याने खुलेआम गुटखा विक्री सुरु आहे? . अन्न औषध प्रशासन विभागाची भूमिका कायम संशयास्पद आहे तर पोलिसांची भूमिका विचार करायला लावणारी आहे. एखाद्या गुटखा विक्रेत्याला गुटखा विक्री करताना एकदा पकडल्यानंतर

त्याला कोणी कोणी गुटखा पुरवठा केला किंवा त्याने कोणा कोणाला विकला. याचा शोध लावून संपूर्ण गुटखा विक्रीची पाळेमुळे आजपर्यंत का शोधली जात नाहीत ? . काही व्यापाऱ्यावर जर वारंवार गुटखा विक्रीचा गुन्हा दाखल होवूनही तो गुटखा विक्रीचा व्यवसाय पुन्हा पुन्हा करण्याची ताकत त्याला नक्की कोण देतं ? . कारवाईची भिती वाटण्याऐवजी, कारवाई झाल्यानंतर तो गुटखा

विक्रेता अधिक जोमाने गुटख्याची खुलेआम विक्री कसा करु शकतो ? . म्हणजेच कायद्याचा धाक नसावा किंवा पुन्हा विक्री करण्याची मुभा नकळत मिळत असावी. जिल्ह्यात आत्तापर्यंत अनेकवेळा गुटखा विक्रेत्यावर काही कारवाया करण्यात आल्या . परंतु लातूर पोलिसांना मोठ्या व्यापाऱ्याला पकडता का आले नाही ? . किंवा ते जिल्ह्यातील आणि शहरातील दोन – तिन बडे व्यापारी

पोलिसांना आणि अन्न औषध प्रशासनाला का सापडत नाहीत ? . लातूर जिल्ह्यात आणि शहरात काही व्यापाऱ्याची गुटखा विक्री वर्षानुवर्षे खुलेआम होत असताना पोलिसांना आणि अन्न औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना हे का दिसत नाही ? . नवे पोलीस अधीक्षक या गंभीर बाबीत लक्ष घालतील का? गुटखा विक्री करणारे बडे व्यापारी व गुटखा विक्रीला छुपा पाठिंबा देणाऱ्या अधिकाऱ्यांना लगाम घालणार का याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे .

Most Popular

To Top