महाराष्ट्र

अभिनेते प्रशांत दामले यांचे कौतुक करताना राज ठाकरे आणि विक्रांत गोजमगुंडे यांचे एक विचार एक भावना

महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) – मनसे प्रमुख राज ठाकरे आणि मा.महापौर विक्रांत गोजमगुंडे यांच्या कडून प्रशांत दमले यांचे कौतुक करताना एकच भावना, एकच विचार काल दि.6 नोव्हेंबर रोजी मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात मराठी रंगभूमी गजावणारे, मराठी नाटक घराघरात पोहचवणारे , मराठी रंगभूमी जगलेला प्रसिद्ध अभिनेते

आणि गेली तीन दशके मराठी रंगभूमीवरील अधिराज्य गाजवणारे प्रशांत दामलेंच्या ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ या नाटकाचा 12,500 वा प्रयोग पार पडला. या प्रयोगाच्या कार्यक्रमासाठी खास मनसे प्रमुख राज ठाकरे उपस्तित होते. राज ठाकरे यांनी यावेळी बोलताना प्रशांत दामले यांनी आपल्या आयुष्यातील खूप वेळ नाटकांसाठी दिला

आहे. सरासरी तीन तासांचे नाटक असते. 12 हजार 500 प्रयोग झाले म्हणजे दामले 37 हजार तास म्हणजेच 1562 दिवस रंगमंचावर आहेत असे कौतुक केले. पण प्रशांत दमले यांचे असेच कौतुक याआधी लातूरचे मा महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी 13 ऑक्टोबर रोजी प्रशांत दमले यांच्या नाटकाचा प्रयोग लातूर मध्ये होता त्यावेळी केले

होते. या निमित्ताने एक गोष्ट दिसून आली ती म्हणजे राजकारणात असताना कलाकारा प्रती एक विचार, एक तळमळ क्वचितच असते ती राज ठाकरे आणि मा. महापौर विक्रांत गोजमगुंडे यांच्यात दिसून आली. तस पहिले तर या दोन्ही नेत्यांचा अभिनय क्षेत्राशी जवळून संबंध आहे. राज ठाकरे यांचे वडील श्रीकांत केशव ठाकरे

हे मराठीतील एक अत्यंत गुणी आणि प्रसिद्ध संगीतकार होते. तर विक्रांत गोजमगुंडे यांचे काका (चुलते) श्रीराम गिजमगुंडे मराठी हे एक मराठी अभिनेते, दिग्दर्शक आणि नाट्य-चित्रपट निर्माते होते. कदाचित याच कारणामुळे किंवा समाजाप्रती आणि कलाकारांप्रति असलेल्या आपुलकीमुळे प्रशांत दमले यांच्या प्रती एकच भावना,

विचार आणि कौतुक वेक्त केले. या पुठेही राजकारणात राज ठाकरे आणि विक्रांत गोजमगुंडे असे विचार दिसून आलेतर नवल वाटायला नको.

Most Popular

To Top