महाराष्ट्र

आरोग्य केंद्रात रात्री डॉक्टर हजर नसतील, ते तेथेच निलंबित केले जातील – तुकाराम मुंडे

महाराष्ट्र खाकी (पुणे / विवेक जगताप) – तुकाराम मुंडे यांनी आरोग्य खात्याचे आयुक्त व राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक म्हणून पदभार स्विकारताच पुन्हा आपली स्टाईल दाखवण्यास सुरवात केली आहे.राज्यात प्रत्येक दवाखान्यातून जनतेला आरोग्य सेवा व्यवस्थित मिळालीच पाहिजे यासाठी तुकाराम मुंडे यांनी पदभार स्विकारताच भेटींचा धडाका सुरू केला आहे. त्यांच्या या

भेटीने कामचुकार अधिकाऱ्यांच्या उरात भितीने धडकी भरली आहे. काल रात्री दीडच्या सुमारास राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, जिल्हा रुग्णालय येथे रात्रीच्या वेळी आरोग्य उपसंचालक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यासह वरिष्ठ डॉक्टरांकडून धाडसत्राला सुरुवात केली. रुग्णालयांची पाहणी केल्यावर डॉक्टर

उपस्थित नसल्यास निलंबनाची कारवाई होणार असल्याचे मुंढे यांनी सांगितले. राज्यातील सर्व आरोग्यकेंद्रांना शिस्त लागावी. तसेच ती पूर्ण कार्यक्षमतेने सुरु व्हावीत अशी अपेक्षा असल्याचे तुकाराम मुंढे यांनी यावेळी सांगितले. पुण्यातील आळंदी, वाघोली येथील ग्रामीण रुग्णालयात केली तपासणी ,तेथे डॉक्टर उपस्थित असल्याने कारवाई टळली.

Most Popular

To Top