पोलीस

जुगार आड्यावर पोलिसांचा छापा दोन लाख एक हजार सातशे दहा रू चा मुद्देमाल जप्त करून 26 जनावर कारवाई

महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप ) – राज्यातील बहुतांश जिल्ह्यात मटका व सोरट जुगार सर्रास चालू आहे. पोलीस कारवाई करत असता पण हे अवैद्य धंदे बंद काही होत नाहीत. पण पुणे पोलीस आयुक्त अमिताभ यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी मटका आणि सोरट जुगार आड्यावर छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. सामाजिक सुरक्षा विभागाने मटका व सोरट जुगार

अड्डयावर छापा टाकून 26 जणांवर कारवाई करून दोन लाख एक हजार सातशे दहा रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दि.01/102022 रोजी औंध बाणेर लिंक रोड, औंध पुणे या परीसरात काही जण बेकायदेशीर पणे मटका व सोरट जुगार पैसे लावून खेळत असल्याचे बातमीदारा मार्फत मिळालेल्या बातमीची खात्री करून सदर ठिकाणी सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेकडील अधिकारी व

पोलिस अमंलदार यांनी गोपनियरित्या पाळत ठेवून छापा टाकला.घटनास्थळी बेकायदेशीरपणे कल्याण मटका व सोरट जुगार पैसे लावून खेळवत व खेळत असलेले एकूण 25 जणांना ताब्यात घेवून त्यांचे कडून कल्याण मटका व सोरट जुगारातील रोख रक्कम, मोबाईल व जुगाराचे साहित्य असा एकूण 2,1,710/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

तसेच ताब्यात घेतलेले 25 जण व जुगार अड्डयाचा मालक पाहिजे आरोपी असे एकूण 26 जणांविरूध्द चतःश्रृंगी पोलिस स्टेशन येथे गुरनं 429/2022 महाराष्ट्र जुगार बंदी अधिनियम कलम 12 (अ) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला व त्यांना पुढील कारवाई करीता चतःश्रृंगी पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. हि कारवाई पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलिस सह आयुक्त संदिप

कर्णिक, अपर पोलिस आयुक्त, गुन्हे, पुणे, रामनाथ पोकळे, पोलिस उप आयुक्त गुन्हे, श्रीनिवास घाडगे यांचे आदेश व मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कुंभार, सहा. पोलिस निरीक्षक, अश्विनी पाटील, पोउपनि श्रीधर खडके, पोलिस अंमलदार, राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे, अजय राणे, आण्णा माने, हणमंत कांबळे, संदिप कोळगे, अमित जमदाडे या पथकाने यशस्वी केली.

Most Popular

To Top