महाराष्ट्र

अमित देशमुखांनी जनतेला खोटी आश्‍वासने देवून फसविण्याचे काम केले – माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर

महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) – लातूरच्या राजकारणातील देशमुख आणि कव्हेकर यांच्यातील राजकीय घटना, आरोप प्रतिअरोप यांची चर्चा सारखीच असते. देशमुखांच्या विरोधकांनी कितीही आरोप केले तरी देशमुखांनी आपले कार्य चालू ठेवले, लातूरचे माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर लातूरच्या विकासासाठी आणि प्रगतीसाठी सतत प्रयत्नशील असतात. कव्हेकरांनी देशमुखांच्या कार्याबद्दल सतत

विरोध आणि आरोप करत आले आहेत. काही दिवसापूर्वी जननायक संघटनेच्या कार्यक्रमात बोलताना कव्हेकरांनी देशमूखांवर जनतेला फसवील्याचा आरोप केला आहे. लातूर जिल्ह्यातील जनतेला उजनी धरणाचे पाणी एक महिण्यात आणू नसता आमदारकीचा राजीनामा देवू असे सांगणारे अमित देशमुख 3 वर्ष मंत्री असताना साधा प्रश्‍नही उपस्थित केला नाही. फडणवीस सरकारने मराठवाडा परिवर्तनासाठी वॉटरग्रिड योजना मंजूर करून टेंडर काढले

होते. सरकार  बदलानंतर या योजना बंद करण्यात आले. मराठवाडा विकास मंडळ बंद पडले. तरीही आवाज उठवला नाही. जनतेला खोटी आश्‍वासने देवून सत्तेचा राजकारणाचा उपयोग स्वतःच्या स्वार्थासाठीच केला. अशा लोकांना जनतेने कायमचे बाजूला सारले पाहिजेत. जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकर्‍यांची लुबाडणूक केली जिल्ह्यातील मांजरा, रेणा, विकास कारखान्याविरूध्द

(FRP) एफआरपीप्रमाणे भाव द्यावा, शेतकर्‍यांना रिक्‍वरीची माहिती द्यावी व इतर मुद्यासंदर्भात मार्च 2022 मध्ये मी स्वःताच्या नावाने हायकोर्टात रीट दाखल केले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व कारखान्यांना भाव द्यावा लागणारच अन्यथा त्यांच्यावर कार्यवाही होणार आहे. शेतकर्‍यांची ऊसतोड करीत असताना या सर्व कारखान्यामध्ये वाहन वाल्यांनी 2000 रूपये ऊसतोड

टनाला 1200 रूपये मशीन तोड 12000 रूपये पेक्षा अधिक घेतल्याची तक्रार अनेक लोकांनी यापूर्वी केली व बैठकीतही केली. या शेतकरी लुटीला साखर कारखानदार जबाबदार आहेत. याविरूध्द आपण शासनाकडे तक्रार करू असेही कव्हेकर म्हणाले. येणार्‍या निवडणुका ताकतीने लढू येत्या काळात मार्केट कमिटी, महानगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुका आहेत.

लातूर मार्केट कमिटी सन 1993 मध्ये आपण मुदत संपल्यामुळे बाजूला झालो. त्या काळात मूरूड, रेणापूर,लातूरला जी उभारणी झाली. त्यामध्ये नवीन काहीही झालेले नाही. उलट शेतकरी कामगार यांचे हाल होत आहेत. त्यामुळे पुढील काळात येणार्‍या निवडणुका सत्ताधार्‍यांच्या विरोधात ताकतीने लढवून जनतेला व संस्थेला न्याय देवू असे प्रतिपादन माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी केले.

Most Popular

To Top