गंजगोलाई परिसरात वाहतूकीस अडथळा निर्माण करणार्‍या परवानाधारक, विनापरवानाधारक हातगाडीवाल्यांवर तात्काळ कार्यवाही करा – अजित पाटील कव्हेकर

महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप) – लातूर शहरातील गंजगोलाई भागातील आणि शहरातील अन्य मुख्य ठिकाणी हातगाडीवाल्यांचे अतिक्रमण झाले की काय असे म्हणावे लागेल. सोबत या हातगाडीवाल्यांची सामान्य नागरिकांसोबत दादागिरी काही दिवसा पूर्वीतर एका हातगाडीवाल्यांने शुल्लक कारणावरून ग्राहकांच्या डोक्यात एक किलीचा बाट घातला अशा घटना रोज होत

आहेत. नागरिक परेशान आहेत. या सर्व घटनाकडे ना मनपा प्रशासन लक्ष देत आहे ना RTO आणि पोलीस प्रशासन, पण लातूरच्या जनतेच्या कुठल्याही समस्से विषयी आक्रमपणे आवाज उठवणारे लातूर मनापाचे तरुण, अभ्यासू माजी नगरसेवक आणि भारतीय जनता युवा मोर्चा लातूरचे जिल्हा अध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांनी मनपा आयुक्त यांना निवेदन दिले आहे. लातूर

महानगरपालिकेने शहरातील गंजगोलाई परिसरात हातगाडीवाल्यांना व्यापार करण्यासाठी जागा निश्‍चित करून दिलेली आहे. परंतु अनेक परवानाधारक हातगाडीवाले व विनापरवानाधारक हातगाडीवाले यांची गर्दी वाढल्यामुळे शहरातील नागरिकांना वाहतूकीच्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे. त्यातच हातगाडीवाले व्यापार करीत असताना त्यांचे

नागरिकांसोबतचे वर्तन असभ्यपणाचे दिसून येत आहे. त्यामुळे विनाकारण नागरिकांना त्रास होत आहे. तरी महानगरपालिकेने लक्ष देऊन गंजगोलाई परिसरातील परवानाधारक हातगाडीवाल्यांना त्यांनी ठरवून दिलेल्या जागेतच व्यापार करण्याची परवानगी द्यावी. तसेच काही परवानाधारक गाडीवाले नियमांचे पालन करीत नसतील तर त्यांच्यावरही कठोर कार्यवाही करण्यात यावी.

याबरोबरच विनापरवानाधारक हातगाडीवाल्यांवरही कार्यवाही करावी .त्याच बरोबर लातूर महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून काही दिवसापूर्वी शहरवासीयांना नळपट्टीची बिले देण्यात आली असून यामधून नळपट्टीच्या बिलाचा सावळा गोंधळ समोर आलेला आहे. काही नागरिकांना नळ कनेक्शन नसतानाही नळपट्टीची बिले, काही नागरिकांना वाढीव नळपट्टीची बिले

येत आहेत त्या बाबतीतही संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष घालून योग्य ती कारवाई आणि त्या संबंधित उपाय योजना करण्यात याव्यात अन्यथा भारतीय जनता युवा मोर्चा लातूर शहर जिल्ह्याच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही या निवेदनाद्वारे मनपा आयुक्‍तांना देण्यात आलेला आहे.

Recent Posts