महाराष्ट्र

लातूर येथील प्रसिद्ध डॉ.मायाताई कुलकर्णी यांची लातूर जिल्हा रोटरी कॉपच्या अध्यक्षपदी निवड

महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप) – वैद्यकीय क्षेत्रात आणि सामाजिक क्षेत्रात आपल्या कार्यातून स्वतःचे आणि लातूरचे नाव करणाऱ्या डॉ.मायाताई कुलकर्णी यांची लातूर जिल्हा रोटरी कॉपच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. डॉ मायाताई कुलकर्णी यांच्या अध्यक्षपदी निवड झाल्यामुळे त्यांच्यावर मित्र परिवाराकडून आणि विविध क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. लातूर

जिल्ह्यातील सर्व रोटरी क्लबमध्ये समन्वय निर्माण व्हावा आणि संपूर्ण जिल्ह्यात रोटरीद्वारे विविध समाजपयोगी कार्यक्रम राबविले जावे या दृष्टिकोनातून लातूर जिल्हा रोटरी कॉपची निर्मितीमध्ये रोटरीचे माजी व आजी प्रांतपाल, सहाय्यक प्रांतपाल, अध्यक्ष, सचिव करीत असतात. लातूर जिल्हा रोटरी कॉपच्या अध्यक्षपदी डॉ.मायाताई कुलकर्णी आणि सचिवपदी

डॉ.गुणवंतबिरादार यांची नुकतीच भालचंद्र ब्लड बँक सभागृहामध्ये निवड करण्यात आली. त्यांचा सत्कार माजी अध्यक्ष शशिकांत चलवाड आणि सचीव महेंद्र दुरुगकर यांच्या हस्ते करण्यात आला. त्यांच्या झालेल्या या निवडीबद्दल रोटरीचे माजी प्रांतपाल डॉ.हरिप्रसाद सोमानी, डॉ. विजयभाऊ राठी, डॉ.ओमप्रकाश मोतीपवळे, शशिकांत मोरलावार, लक्ष्मीकांत सोनी, मेघराज बरबडे, राजगोपाल तापडिया आदिनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

Most Popular

To Top