महाराष्ट्र

माजी मंत्री आ.धनंजय मुंडे यांच्याबाबतचे पन्नास खोकेवाल्या गद्दार मंत्री तानाजी सावंत यांचे बेताल वक्तव्य राष्ट्रवादी खपवून घेणार नाही – बाजीराव धर्माधिकारी

महाराष्ट्र खाकी ( परळी / प्रतिनिधी ) – ठाकरे कुटुंबाने दिलेल्या संधीमुळे मोठे झालेले मात्र 50 खोके घेऊन ठाकरे कुटुंबाला गद्दार होऊन सत्तेत बसलेले गद्दार मंत्री तानाजी सावंत यांच्या बुडाखालचा सगळा अंधार आम्हाला माहीत आहे, मात्र कुणाच्या व्यक्तिगत आयुष्यात डोकावून टीका करण्याची आमची संस्कृती नाही, गद्दार मंत्री तानाजी सावंत यांचे आमचे नेते माजी मंत्री आ. धनंजय मुंडे साहेब

यांच्या बद्दलचे बेताल वक्तव्य आम्ही अजिबात खपवून घेणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे परळी शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी केले आहे. आपण आता केवळ एक गद्दार आमदार नसून राज्याचे मंत्री आहात, त्यामुळे रस्त्यावरच्या गावगुंडासारखे बेताल बोलणे टाळून जबाबदारीचे भान राखून बोलले पाहिजे, असा खोचक सल्लाही धर्माधिकारी यांनी दिला आहे.

बीड जिल्हा दौऱ्यावर असताना शनिवारी मंत्री तानाजी सावंत यांनी बीड येथील एका कार्यक्रमात धनंजय मुंडे यांच्यावर नाव न घेता टीका केली होती, त्यावेळी सावंत यांची जीभ चांगलीच घसरली होती. त्यानंतर त्यांना आता धनंजय मुंडे यांच्या समर्थकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. पुण्यात एक किलोमीटर अंतरावरील ऑफिस वर शासकीय दौरा दाखवून दिवसभर चकरा मारणे,

हाफकीन नावाचा माणूस राज्याला औषधे पुरवतो असा जावई शोध लावणे, खेकड्यानी मिळून धरण फोडले असा अजब व हास्यास्पद दावा करणे अशा अनेक बौद्धिक दिवाळखोऱ्या तानाजी सावंत यांनी याआधीही केल्या आहेत. त्याचबरोबर त्यांच्या संस्थांमधील गैरप्रकार व त्यावरून त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यात झालेली ससेहोलपट सर्वांना परिचित आहे. असे असताना तानाजी सावंत यांनी

इतर नेत्यांवर व्यक्तिगत टीका करणे किती योग्य आहे, असा सवाल बाजीराव धर्माधिकारी यांनी उपस्थित केलाय. गद्दार मंत्र्यांनी आपल्या जिभेला वेळीच आवर घालावी व त्यांना उपरती व्हावी,अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी दिला आहे.

Most Popular

To Top