पोलीस

लातूर जिल्ह्यात लहान मुलांना पळवणारी ठोळी सक्रिय असल्याच्या अफवा तथ्यहीन व खोट्या आहेत – पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे

महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) – राज्यातील विवीध शहरात लहान मुले पळविणारी टोळी सक्रिय झाली असून समाजमाध्यमावर ध्वनिचित्रफीत प्रसारित करण्यात येत असल्याचे आढळून आले आहे. अशा प्रकारच्या ध्वनिचित्रफितीमुळे पालकांमध्ये भीती पसरली असून अफवांवर पसरविणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर

लातूर पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी जनतेला आवाहन केले आहे. लातूर जिल्ह्यात लहान मुलांना पळवणारी ठोळी सक्रिय असल्याच्या अफवा पसरत आहे, या अफवांची लातूर पोलीसांनी शहानिशा व सखोल चौकशी केली असता ह्या अफवा तथ्यहीन व खोट्या असल्याच्या खात्री झाली आहे. शाळा, महाविद्यालय परिसटात पोलीसांची गस्त वाढवण्यात आली आहे.

पोलीस यंत्रणा सतर्क असून असे व्हिडिओ विनाकारण व्हायरल करु नयेत. आपल्या मुलांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी, घर , गल्ली, परिसरात कोणीही अनोळखी व्यक्ती, संशयास्पद व्यक्ती आढळल्यास जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये त्वरित कळवावे. या संदर्भातील काही जुने किंवा इतरत्र घडलेल्या घटनांचे जुने व्हिडिओ मोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र त्याचा लातूर

जिल्ह्याशी काहीही संबंध नाही. जर कोणी जाणीवपूर्वक अशा अफवा पसरवत असल्याचे आढळून आल्यास कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात येईल. तमेच कोणीही संशयास्पद समजून कोणत्याही व्यक्तीला मारहाण करु नये, अशा प्रकारे कायदा हातात घेऊ नये पोलीसांशी संपर्क करावा असे आवाहन लातूर पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी लातूरच्या जनतेला केले आहे.

Most Popular

To Top