पोलीस

आपल्या कार्यातून लातूरकरांच्या मानात घर करणारे पोलीस अधीक्षक IPS निखिल पिंगळे

महाराष्ट्र खाकी ( लातूर / प्रतिनिधी ) – लातूर जिल्ह्याला आत्तापर्यंत लाभलेले पोलीस अधीक्षकांनी आपली अशी स्वतःची ओळख निर्माण केली, आपल्या कार्यातून आणि कर्तव्यदक्षतेने लातूरच्या जनतेच्या मानत घर निर्माण केले आहे. आणि लातूरकर त्यांच्या कार्याला कधीही विसरणार नाहीत. असेच कार्य सध्याचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी सुद्धा केले आहे. लातूर जिल्ह्यातील

गुन्हेगारीचा आणि अवैद्या धंद्याचा आलेख उतरला आहे. जिल्ह्यातील कायदा सुवेवस्था सुरळीत ठेवण्यात निखिल पिंगळे यांना चांगले यश मिळाले आहे. निखिल पिंगळे यांच्या कार्यपद्धतीचे जिल्ह्यातील नागरिक तर कौतुक करत आहेत पण जिल्हा पोलीस दलातील पोलीस अधिकारी सुद्धा निखिल पिंगळे यांच्या कार्याचे कौतुक करत आहेत. लातूर जिल्हा पोलीस दलातील आणि

किल्लारी पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले आबासाहेब बापूराव इंगळे यांनी निखिल पिंगळे यांच्या लातूर जिल्ह्यातील कार्याबद्दल एक लेख लिहून त्याचें कौतुक केले आहे.

आज बाहेर पावसाची रिमझिम सुरू होती. मिळालेल्या फावल्या वेळेत मोबाईल वरती पाहता पाहता लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वेबसाईटवर पाहत होतो. त्या क्षणी आजपर्यंतचे पोलीस अधीक्षक पाहण्याची सहज इच्छा झाली त्या कारणाने मी आजपर्यंतचे पोलीस अधीक्षक पाहत होतो मग ते लातूर जिल्ह्याचे पहिले पोलिस अधीक्षक पी.एम ओशेल ते आज घडीला असणारे

निखिल पिंगळे साहेब पर्यंत येऊन थांबलो. क्षणभरात ऑक्टोबर 2020 ते आज पर्यंतचा संपूर्ण संक्षिप्त रूपात प्रवास क्षणभरात डोळ्यासमोरून जात होता. तसे पाहता लातूर जिल्ह्याच्या निर्मितीपासून अनेक कर्तबगार कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षकांची सेवा लाभलेली आहे. मग ते अरुण पटनाईक साहेब, असो की संजय लाटकर साहेब , विश्वासराव नांगरे पाटील साहेब अशा अनेक

अधिकाऱ्यांची सेवा लातूरकरांना लाभलेली आहे त्यात आणखी मोलाची भर पिंगळे साहेब तुम्ही घातलेली आहे. साहेब आपली पार्श्वभूमी पाहता पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पावळ सारख्या छोट्याशा खेड्यातून माध्यमिक शिक्षणाची वाट पूर्ण करून पुण्यासारख्या विद्येचे माहेरघर असणाऱ्या शहरात उर्वरित शिक्षण पूर्ण करून. आपण पुढील शैक्षणिक चढउतार पूर्ण करून

तुमच्या आई-वडिलांनी आपला मुलगा भारतीय प्रशासकीय सेवेत गेला पाहिजे. हे स्वप्न पूर्ण करण्याकरता तुम्हीअहोरात्र मेहनत घेऊन ते स्वप्न पूर्ण केलात हे जरी कौतुकास्पद असले तरी आपल्यातला वर्दीतला माणूस हा वेगळ्या रूपाने माझ्यासारख्या कर्मचाऱ्याला अनेक अंगाने दिसून आलात. मग ते तुम्ही खाकीवर्दीतील आई बद्दलची जाणीव असो की तुम्हाला घडवण्याबरोबरच संसाराचा

सांभाळणारा डोलारा हा कर्तव्य आणि जबाबदारी यामध्ये घालून दिलेली तारेवरची कसरत आहे. या कर्तव्यदक्ष व जबाबदारीची जाणीव असणाऱ्या आईच्या सानिध्यातच आपणाला जे बालकडू देण्यात आलेले आहे .ते साहेब आपल्यात वारंवार दिसून येत. म्हणूनच आपल्यासारखा सामाजिक बांधिलकी जपणारा, समाजाप्रती असणारे आपले उत्तरदायित्व ,कर्तव्य तसेच देशाप्रती असणारी

जबाबदारी, संस्कृतीचा वारसा, कर्मचाऱ्या बद्दलची सहानुभूती अशा अनेक गुणांनी आपले व्यक्तिमत्व सजलेले दिसून येते. म्हणून माझा पहिला साष्टांग नमस्कार त्या सावित्री आणि जिजाऊच्या लेकीला अर्थात आपल्या आईला ,साहेब एक कर्मचारी म्हणून आपल्या पोलीस अधीक्षक या पदाच्या कामगिरीचा आढावा घेताना मला काही घटना नमूद कराव्याशा वाटतात मग ते आपली प्रथम

नियुक्ती गोंदिया सारख्या जिल्ह्यापासून ते आज लातूर सारख्या सुसंस्कृत जिल्ह्यापर्यंत ,गोंदिया सारख्या नक्षलग्रस्त जिल्ह्याची सीमा असणाऱ्या जिल्ह्यात आपण परिविक्षाधीन कालावधी अगदी यशस्वीपणे पूर्ण करून, अख्ख्या महाराष्ट्राचा भक्ति सागर असणारे वैकुंठ म्हणजे पंढरपूर येथे आपण उप विभागीय पोलीस अधिकारी या पदावर रुजू झालात.यादरम्यान पंढरपूर परिसरात अवैद्य

धंद्याची सुळसुळाट फार मोठ्या प्रमाणात सुरू होती. आपण आपल्या कार्यकुशलतेची पहिली झलक या अवैद्य धंद्याची बीमोड यशस्वीरित्या करून दाखवली. आजही आपल्या नावाची चर्चा उक्त परिसरात अवैद्य धंद्याला पाठबळ देणारे आदबी ने घेतात, पंढरपूर सारख्या शहरात आपल्या कार्यकुशील तिची चुणूक दाखवून आपण वर्धा जिल्ह्यात अप्पर पोलीस अधीक्षक या पदावर रुजू झालात.

याही जिल्ह्यात होमगार्ड फसवणुकी सह अनेक गुन्ह्याचा छेडा आपण विहित वेळेत लावून आपल्या कामाचा ठसा उमटविलात. कोरोना सारखी महामारीत महाराष्ट्र राज्याची उपराजधानी असणाऱ्या नागपूर शहरात आपण राज्य राखीव पोलीस दलाचे समादेशक म्हणून कोरोना काळात केलेली कामगिरी वाखण्याजोगी आहे. उपरोक्त कामगिरीची पावती म्हणून आपणास लातूर जिल्ह्याच्या

पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती देण्यात आली. हे तत्कालीन अनेक वर्तपत्रात चर्चेचा विषय होता. साहेब ऑक्टोबर 2020 पासून आज पर्यंत आपल्या नेतृत्वाखाली काम करत असताना आपल्या कामाची व सक्षम नेतृत्वाची चुणूक अनेक कामातून दिसून आली. मग ते कोरोना सारख्या महामारी काळातील पोलीस कर्मचारी यांची काळजी असो किंवा जिल्ह्यातील कोरोना संबंधित

निर्बंधाच्या अधीन राहून जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेने कसे वागले पाहिजे ,व पोलीस प्रशासनास कशी मदत केली. पाहिजे हे अगदी सहजरित्या सर्वसामान्यास समजेल अशा पद्धतीने जनजागृती केली. या उपरोक्त जिल्हाभर पोलीस प्रशासनाची कामगिरी दिसून आली. नेतृत्वाचा हात आपल्या पाठीवर असला की कुठल्याही कामावर त्याच पद्धतीने सकारात्मक परिणाम दिसून येतो. या ओळीस

जागून माननीय पोलीस अधीक्षक साहेबांनी कोरोना काळात चोख जबाबदारी पेलेल्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविलात. याबद्दल कायम आभारी असेन.समाजातील प्रत्येक घटकाला पोलीस आपलेसे वाटले पाहिजे, या दृष्टिकोनातून साहेब अनेक उपक्रम या विविध माध्यमातून आपण सबंध लातूर जिल्ह्यात पोलीस प्रशासनाची आज जी प्रतिमा बदललेली

दिसून येत आहे. ते केवळ आपल्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्वाचे फलित आहे. मग ते अग्निवीर होऊ पाहणाऱ्या युवकांना आव्हान करण्यापासून ते विहित वेळेत गुन्ह्याचा तपास लावण्याचा पॅटर्न असो याबाबत येथे नमूद करण्यास मला वावगे वाटत नाही ,की सबंध महाराष्ट्र भर विहित वेळेत गुन्ह्याचा तपास लावण्याचा निखिल पिंगळे साहेब पॅटर्न लातूर पॅटर्न च्या जोडीने महाराष्ट्रभर

चर्चेचा विषय ठरत आहे. मग त्यात उजबळे खून प्रकरण असो की, शेतकऱ्यांना फसवणूक करून सोयाबीन लुबाडणाऱ्या टोळींना धडा शिकवणे, तसेच मोटरसायकल चोर अशा विविध गुन्ह्यांना चाप बसविण्यात आपल्या नेतृत्वाखाली जिल्हा पोलीस प्रशासनाला कायमच यश मिळत गेलेले आहे. पोलीस हे दंड आणि शिक्षा व्यतिरिक्त सर्वसामान्य माणसाशी जोडले जातात हे आपण वारंवार

आपल्या कृतीतून दाखवून दिलेले आहात. मग ते मोबाईलचा गैरवापर पासून होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी समुपदेशन केंद्र, तसेच भरोसा केंद्र, वाहतूक सुरक्षा अभियान, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन ,केंद्रीय लोकसेवा परीक्षेत घवघवीत यश संपादन करणाऱ्या यशस्वी विद्यार्थ्यांचे सत्कार समारोह, तसेच वेळोवेळी साजरा करण्यात येणारे धार्मिक सामाजिक उत्सव त्या अनुषंगाने

जिल्हाभर आयोजित करण्यात येणाऱ्या शांतता बैठकीतून अनेक नेतृत्व होऊन आपल्यात दिसून आले. काळानुरूप पोलीस दलाला गतिमानता आवश्यक आहे. यानुसार जिल्हा पोलीस प्रशासन प्रशासनास आणखी गतिमान करण्याकरिता पोलीसवाहन 28 चार चाकी 51 दोन चाकी वाहने मिळवून देऊन, भविष्यात जिल्हा पोलीस प्रशासनाला आपले उत्तरदायित्व आणखी प्रभावीपणे पार

पाडण्याकरता नक्कीच मदतशील ठरेल या उपरोक्त आपण जनहितार्थ 112 हेल्पलाइन सुरू करून सर्वसामान्यांना पोलीस प्रशासनाकडून अगदी सहजरित्या जिल्हा परिक्षेत्रत मदत मिळाली पाहिजे या अनुषंगाने सुरू करण्यात आली. विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून ट्यूशन एरियात घेतलेली मीटिंग असो किंवा मेस चालवणा-या घेतलेली मीटिंग असो आपल्या

नेतृत्वाखाली लातूर जिल्ह्याच्या इतिहासात पोलीस प्रशासनाने अशा नाविन्यपूर्ण व जनहितार्थ केलेले कामे आज पर्यंत अशा पद्धतीने केल्याचे कदाचित सर्वसामान्य जनतेने पाहिले नसतील ,साहेब हा शाब्दिक प्रपंच संपवत असताना माझ्यासारखा कर्मचारी आपल्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मिळत आहे. याचा मला कायमच अभिमान राहील आणि आपल्या नेतृत्वाखाली काम करायला संधी मिळाली, याच ही मी माझं भाग्य समजतो अनेक गोष्टी येथे मांडण्याच्या राहून गेल्या याची खंत मनात ठेवून मी येथे थांबतो.

जय हिंद ! साहेब आपला कर्मचारी आबासाहेब बापूराव इंगळे. . .ब न 1868 नेमणुक पाेलीस स्टेशन किल्लारी

Most Popular

To Top