पोलीस

लातूर जिल्ह्यात “संजू” चा मटका जोरात! लातूरला भेटला “संजू” नावाचा नवा “गुरुजी” !

महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप) – लातूर जिल्ह्यात आणि शहरात अवैद्य धंदे पुन्हा जोर पकडू लागले आहेत असे म्हणले तर चुकीचं ठरणार नाही. विशेषतः मटका घेळणारे आणि घेणारे यांचे लातूर शहरात सुळसुळाट झाला आहे. पोलिसांच्या कारवाया होत आहेत तरी मटका चालवणारे काही ठराविक लोक आहेत जिल्ह्यात यांच्या मटका अड्डयावर पोलीस जाणीवपूर्वक

दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. त्याला करणेही तसेच आहेत लातूर शहरात संजू नावाचा मटका चालवणारा मोठा बुकी आहे. या मटका बुकी चालकाने अशी काय जादू केली की यांच्या मटका आड्यावर पोलिसांची नजर जातच नाही आणि जारी गेली तरी पोलीस जाण्याच्या अगोदर पोलीस येणार असल्याची टीप जाते हा योगायोग नेहमी होत असतो. पण हा योगायोग

इतर मटका बुकी चालकांच्या मटका आड्यावर होताना दिसत नाही. यांच्यावर पोलिसांची धडक कारवाई होते. संजू या मटका बुकी सोबत काही पोलीस अधिकाऱ्यांचे चांगले संबंध असल्यामुळे याच्या मटका आड्यावर पोलीस दया – कृपा दाखवत असतील! . इतकंच काय तर पोलीस आणि या मटका बुकी च्या लेट नाईट पार्ट्या पण होत आहेत अशा चर्चा शहरात होत आहेत. लातूर पोलीस

अधीक्षक यांनी जिल्ह्याचा कारभार स्वीकारून दोन वर्ष कालावधी झाला आहे. मागील दोन वर्षाच्या काळात जिल्ह्यातील आणि शहरातील अवैद्या धंदा करणारे बिळात बसले होते पण मागील काही महिन्यापासून पोलीस संजू मटका बुकीवर विशेष आशीर्वाद दिल्याचे दिसून येत आहे. काही पोलीस अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने संजू चा मटक्याचा धंदा जोमात चालू आहे. या सर्व प्रकाराकडे

पोलीस अधीक्षक लक्ष देतील आणि संजू नावाच्या वेक्तीचा मटक्याचा धंदा बंद करतील आणि कडक कारवाई करतील ही अपेक्षा !

Most Popular

To Top