महाराष्ट्र खाकी (धुळे / विवेक जगताप) – राज्यात महसूल विभागात सर्वाधिक लाच घेतली जाते असे एका सर्वेक्षनातून समोर आले आहे ! मागील काही दिवसापूर्वी लातूर जिल्ह्यातील निलंग्याचे तहसीलदाराला ACB ने अटक केली होती. हे प्रकरण ताजे असतानाच आता धुळे जिल्ह्यातील पिंपळनेरचे तहसीलदार याला शेत जमीन खरेदीच्या व्यवहारासंदर्भातील कागदपत्रे जिल्हाधिकारी
कार्यालयात पाठवण्यासाठी 25 हजाराच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी तहसीलदारासह खासगी हस्तकावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पथकाने कारवाई केली. याप्रकरणी पिंपळनेर येथील तहसिलदार विनायक थविल यांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरण त्याला मदत करणारा मात्र खाजगी हस्तक संदीप मुसळे हा फरार झाला आहे. पिंपळनेर येथील तरुणाने मौजी ढोले पाडा येथे
नवीन शर्तीच्या शेत जमिनीच्या खरेदीचा व्यवहार सौदा पावती ने केला होता. ही शेतजमीन भोगवटादार यांच्याकडे वर्ग होण्यासाठी त्याने पिंपळनेरच्या अप्पर तहसीलदार यांच्याकडे अर्ज केला होता. या प्रकरणात तहसीलदार विनायक थविल यांनी या प्रकरणातील सातबारा उतारा व नोंदी सादर केले नसल्याचे कारण दाखवून हे प्रकरण निकाली काढले होते. या संदर्भातील चौकशी अहवाल
जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवण्यासाठी तहसीलदार थवील यांनी त्या तरुणाकडे तडजोड करत 25 हजार रुपये लाचेची मागणी केली. तसेच ही रक्कम पंटर संदीप मुसळे याच्याकडे देण्यास सांगितले.या सर्व प्रकार त्या तरुणाने धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार लाचलुचपत विभागाने याबाबत पडताळणी करून सापळा रचला. परंतु यांची कुणकुण
लागल्याने तहसीलदार आणि खाजगी पंटर यांनी लाचेची रक्कम स्वीकारण्यास टाळाटाळ केली. याप्रकरणी 25 हजाराच्या लाचेची मागणी केल्याची बाब निदर्शनास आल्याने या दोघांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत पिंपळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले. या घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर गावात ग्रामस्थांनी एकच जल्लोष करीत फटाके फोडून आनंद साजरा केला आहे.
