महाराष्ट्र

भाजपा प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर यांनी राज्यसभेचे सदस्य अनिल बोंडे व धनंजय महाडिक यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले

महाराष्ट्र खाकी ( निलंगा / प्रशांत साळुंके ) – महाराष्ट्रातून राज्यसभा निवडणूक 2022 मधील विजय संपादन केल्याने नवनियुक्त राज्यसभेचे सदस्य अनिल बोंडे व धनंजय महाडिक यांचा प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर यांनी या विजया बदल त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आहे. प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर यांच्याकडे जबाबदारी आल्यापासून त्यांनी

प्रदेशावरील वन बुथ टेन युथच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पक्षबांधणी केली असल्याने त्यांनी या विजयाचे शिल्पकार माजी मुख्यमंञी तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यामुळे हा सहा पैकी तीन राज्यसभेचे सदस्य झाले त्यांनी सांगितले आहे या विजयामुळे माझ्या सारख्या कार्यकर्त्याला द्विगुणित आनंद झाल्याचे सांगितले. येणार्‍या काळात

आपण प्रदेश सचिव या नात्याने आणखीन पक्ष बांधणी करून युवकांना सोबत घेऊन काम करणार असल्याचेही सांगितले आहे.येणार्‍या काळातील प्रत्येक निवडणूका लक्षपूर्वक करून पक्षाला विजयापर्यंत घेऊन जाणार असल्याचे सांगितले.या राज्यसभेच्या निवडणूकीची ही रंगीत तालिम आहे ही निवडणूक ऊर्जास्ञोत देणारी ठरली आहे.त्यांनी सहा पैकी तीन राज्यसभा सदस्यांना अभिनंदन व पुढिल वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Most Popular

To Top