महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचा राज्य सांस्कृृतिक पुरस्कार सद्गगुरू गुरूबाबा महाराज औसेकरांना जाहीर

महाराष्ट्र खाकी ( निलंगा / प्रशांत साळुंके ) – औशाच्या सद्गगुरू श्री वीरनाथ मल्लनाथ महाराज संस्थानचे पाचवे पीठाधीपती सद्गगुरू गुरूबाबा महाराज औसेकर यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्य सांस्कृृतिक पुरस्कार नुकताच जाहीर करण्यात आला आहे. कीर्तनसेवा व भजनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन आणि संस्कार कार्याबद्दल अत्यंत सन्मानाचा हा पुरस्कार जाहीर झाल्याचे

समजताच नाथ संस्थानच्या शिष्य,वारकरी समूहात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. 1692 अर्थातच 260 वर्षांहून अधिक काळापासून अध्दैत भक्तितत्त्व आणि वारकरी सांप्रदायाची धुरा नाथ संस्थानच्या माध्यमातून औसेकर घराण्याने सांभाळली आहे.सद्गगुरू वीरनाथ महाराज, मल्लनाथ महाराज,दासवीरनाथ महाराज, ज्ञानेश्वर आणि विद्यमान पीठाधीपती सद्गगुरू गुरूबाबा

महाराज औसेकर अशी औसा नाथ संस्थानची परंपरा भागवत धर्म प्रसार कार्यात अखंड कार्यरत आहेत. 1985 साली नाथ संस्थानच्या कार्याची धुरा हाती घेत चक्रीभजन,कीर्तनसेवा व प्रवचनाच्या माध्यमातून महाराष्ट्र,आंध्र प्रदेश,कर्नाटक आदी राज्यांतून गुरूबाबांनी वारकरी सांप्रदायाच्या अध्दैत भक्तितत्त्वाच्या प्रचार करीत समाजप्रबोधनाचे कार्य अखंडित सुरू ठेवले आहे. त्यांच्या

या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने त्यांना नुकताच राज्य सांस्कृृतिक पुरस्कार जाहीर करून नाथ संस्थानचाच सन्मान केल्याची भावना वारकरी व भक्तांमध्ये आहे. सन्मानचिन्ह,रोख 1 लाख रूपये असे स्वरूप असलेला हा पुरस्कार नजीकच्या काळात देऊन गुरूबाबांचा सरकारकडून गौरव केला जाणार आहे

Most Popular

To Top