ग्रंथपालन प्रमाणपञ परिक्षेत प्रशांत रघुनाथराव साळुंके उत्तीर्ण निटूर व परिसरात अभिनंदनाचा वर्षाव

महाराष्ट्र खाकी ( निलंगा ) – महाराष्ट्र शासन ग्रंथालय संचालनालय,महाराष्ट्र राज्य, मुंबई ग्रंथपालन प्रमाणपञ परीक्षा, डिसेंबर-2021 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत निलंगा तालुक्यातील निटूर येथील इंदिरा सार्वजनिक वाचनालयाचे ग्रंथपाल प्रशांत साळुंके व यशोदीप सार्वजनिक वाचनालयाचे ग्रंथपाल शिवराज स्वामी यांनी ग्रंथपालन प्रमाणपञ परिक्षा – डिसेंबर 2021 मध्ये

झालेल्या परिक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. या सार्वजनिक वाचनालयाचे ग्रंथपाल प्रशांत साळुंके यांना ग्रंथपालन प्रमाणपञ परिक्षेत 399 गुण प्राप्त झाले आहेत.तर यशोदीप सार्वजनिक वाचनालयाचे ग्रंथपाल यांना ग्रंथपालन प्रमाणपञ परिक्षेत 344 गुण प्राप्त झाले आहेत. या दोन्ही ग्रंथपाल कर्मचार्‍यांचे अभिनंदन पञकार राजकुमार सोनी, पञकार विजयकुमार देशमुख,पञकार

जावेद मुजावर, संपादक रविकिरण सुर्यवंशी,पंकज कुलकर्णी, लातूर जिल्हा ग्रंथालय संघाचे सदस्य गुप्तलिंग स्वामी, संजय रकटाटे, विवेक बिराजदार, यशोदीप सार्वजनिक वाचनालय तथा इंदिरा सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष एस.आर.काळे, एस.एस.काळे, बाळकृृृष्ण डांगे, प्रविण नाईक, ग्रंथालयाच्या कर्मचार्‍यांनी अभिनंदन व्यक्त केले आहे. लातूर जिल्हा सार्वजनिक

ग्रंथालय संघाच्या वतीने ग्रंथपालन प्रमाणपञ परिक्षा-डिसेंबर 2021 मध्ये उत्तीर्ण झालेल्यांचा सत्कार करण्यात आला यात इंदिरा सार्वजनिक ग्रंथालयाचे ग्रंथपाल प्रशांत रघुनाथराव साळुंके यांचा प्रमाणपञ,ग्रंथ स्मरणिका,पुष्पगुच्छ देऊन जिल्हा सार्वजनिक ग्रंथालय संघाचे अध्यक्ष हावगीराव बेरकिले,ग्रंथपालन व्यवस्थापक

तथा वर्गप्रमुख प्रभाकर कापसे,कार्याध्यक्ष डाॅ.ब्रिजमोहन झंवर,मराठवाडा सार्वजनिक ग्रंथालय संघाचे अध्यक्ष राम मेकले,लातूर जिल्हा ग्रंथालयाचे निरिक्षक सोपान मुंडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Recent Posts