शिरुर अनंतपाळ तालुका ग्रंथालय संघाच्या वतीने खासदार सुप्रिया सुळे यांना सार्वजनिक ग्रंथालयाच्या विविध प्रलंबित मागण्याचे निवेदन

महाराष्ट्र खाकी ( निलंगा / प्रशांत साळुंके ) – राष्ट्रवादीच्या खा. सुप्रिया सुळे या शिरुर अनंतपाळ तालुका दौऱ्यावर आले असता श्री अनंतपाळ नवयुवक तालुका अ वर्ग वाचनालयाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष असल्यामुळे वाचनालयास सदिच्छा भेट दिल्या. वाचनालयाच्या वतीने खा.सुळे व पाणीपुरवठा मंत्री संजय बनसोडे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शिरुर अनंतपाळ तालुका

ग्रंथालय संघ,लातुर जिल्हा ग्रंथालय संघ व मराठवाडा विभाग ग्रंथालय संघाच्या वतीने एल.बी.आवाळे यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक ग्रंथालयाच्या विविध प्रलंबित मागण्याचे निवेदन खा. सुप्रिया सुळे याना देण्यात आले यात प्रामुख्याने बारा वर्षापासून कोणत्याही प्रकारे शासन मान्य ग्रंथालयांचा दर्जा बदल करण्यात आला नाही, अनुदानात वाढ करण्यात आली नाही, नवीन ग्रंथालयांना

परवानगी देण्यात आली नाही, त्यामुळे ग्रंथालयांची अवस्था अतिशय दयनीय झाली असून रोजगार हमीच्या कर्मचाऱ्या पेक्षाही कमी वेतन ग्रंथालय कर्मचाऱ्यांना मिळत ड वर्ग ग्रंथालयांना वर्षातून 30 हजार रुपये मानधन मिळते एका कर्मचाऱ्याला रोज चाळीस रुपये मिळतात तीस हजारांमध्ये निम्मे ग्रंथालय खरेदी व निम्मे कर्मचारी पगार वाचनालयाचे भाडे वर्षातून विविध कार्यक्रमांचा खर्च

टपाल खर्च फर्निचर टेबल-खुर्ची बाक दरवर्षी ऑडिट ऑडिट साठी लागणारे सर्व साहित्य खरेदी वर्तमानपत्रांचे बिले मासिकांचे बिले असा विविध खर्च पंधरा हजार रुपयांमध्ये करावा लागतो अशी दयनीय अवस्था ग्रंथालयांची झाली आहे कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे बारा वर्षापासून वेळोवेळी मागणी करून सुद्धा काहीही होत नाही अशा व्यथा शिरुर अनंतपाळ तालुका

ग्रंथालय संघाचे अध्यक्ष एल.बी.आवाळे यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या जवळ मांडल्या. यासंदर्भात अजित दादा पवार यांच्याशी चर्चा करून तुमच्या प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन सुप्रियाताई सुळे यांनी दिले.यावेळी शिरुर अनंतपाळ तालुका ग्रंथालय संघाचे अध्यक्ष एल.बी.आवाळे,उपाध्यक्ष ग्रंथमित्र संजय सुर्यवंशी, उपाध्यक्ष साहेबराव गायकवाड,सचिव ग्रंथमित्र काशिनाथ

बोडके, कार्याध्यक्ष विकास चव्हाण, कार्याउपाध्यक्ष भिमराव गायकवाड, सहसचिव राजाराम ससाणे, कोषाध्यक्ष शिवनंदा चौंसष्टे,जिल्हा ग्रंथालय संघाचे कार्याउपाध्यक्ष अनिल पाटील, ग्रंथपाल प्रशांत साळुंके, श्री अनंतपाळ नवयुवक वाचनालयाच्या उपाध्यक्षा सौ.उज्वला दुरुगकर,सचिव डाॅ.राजकुमार बोपलकर,सुरेश कोटलवार, पंडित शिंदाळकर, श्रीमती ललिता शिवणे, सौ.पदमा येरमलवार, रत्नाकर लव्हांडे, नामदेवराव जगताप आदी उपस्थित होते.

Recent Posts