पोलीस

परिविक्षाधीन अधीक्षक अभयसिंह देशमुख यांचा जुगाराच्या अड्ड्यावर छापा 2 लाख 27 हजार रुपयाचा मुद्देमालासह 20 आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल

महाराष्ट्र खाकी ( लातूर ) – लातूर पोलीस दलास चार IPS अधिकारी लाभले आहेत. हे लातूर जिल्ह्यासाठी खूप अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. चारही अधिकारी तरुण असल्या कारणाने जिल्ह्यात अवैध धंद्याविरूद्ध सुपर फास्ट आणि धाडसी कारवाया होत आहेत. या मुळे जिल्ह्यातील गुन्हेगारी आणि अवैध धंदे यांचे प्रमाण खूप कमी झाले आहे. सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन

कदम यांच्या कार्य पद्धतीचे सध्या जिल्ह्यात विशेषतः लातूर ग्रामीण मध्ये खूप चर्चा आणि परिणाम दिसत आहे. काल दि 22 मे रोजी वाढवणा पोलीस स्टेशन हद्दीत जुगार अड्डयावर मोठी कारवाई करण्यात आली. वाढवणा पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंद्याविरूद्ध कारवाई करण्याचे अनुषंगाने सहाय्यक पोलीस अधीक्षक  निकेतन कदम व परिविक्षाधीन पोलिस अधीक्षक अभयसिंह देशमुख यांचे

नेतृत्वात पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे स्वतंत्र पथक तयार करून विशेष मोहीम राबवली जात आहे. या पथकाने अवैध धंद्यावर कारवाई करीत असताना दिनांक 22/05/2022 रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास परिविक्षाधीन पोलिस अधीक्षक अभयसिंह देशमुख यांना मिळालेल्या माहितीवरून वाढवणा पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे हळी येथील एका ज्यूस सेंटरच्या

पाठीमागील पत्र्याच्या शेडमध्ये चालू असलेल्या तिरट जुगारावर छापा मारला. त्या ठिकाणी स्वतःच्या फायद्यासाठी काही लोकांकडून पैसे घेऊन पत्त्यावर जुगार खेळत व खेळवीत असताना पथकला आढळून आले.
1) जावेद इसाक शेख वय 35 वर्ष धंदा मजुरी राहणार खडकगल्ली, हाळी तालुका उदगीर. 2) युनुस मुजम्मिल शेख, वय 35 वर्ष, धंदा मजुरी, राहणार आदर्श कॉलनी,

हंडरगुळी तालुका उदगीर. 3) मनोहर नामदेव मसुरे, वय 38 वर्ष, धंदा मजुरी, राहणार बौद्ध नगर, हाळी तालुका उदगीर. 4) अहमदपाशा मैनोद्दीन शेख, वय 36, वर्ष धंदा मजुरी, राहणार हाळी तालुका उदगीर. 5) खालील शरीफ शेख, वय 33 वर्ष, धंदा शेती, राहणार खडकपुरा, हाळी तालुका उदगीर. 6) महबूब मैनोदीन सय्यद, वय 32 वर्ष, धंदा मजुरी, राहणार हंडरगुळी तालुका उदगीर. 7)हमजा

सत्तारसाब मोमीन, वय 32 वर्ष, धंदा मजुरी, राहणार हाळी तालुका उदगीर. 8) अशोक दत्तराव धुपे, वय 47 वर्ष, धंदा शेती, राहणार हंडरगुळी, तालुका उदगीर. 9) जाकीर पाशासाहेब डांगे, वय 55 वर्ष, धंदा मजुरी, राहणार हाळी तालुका उदगीर. 10) संजय पंढरीनाथ दापके वय 55 वर्ष धंदा शेती राहणार मोरतळवाडी, तालुका उदगीर. 11) बालाजी रंगनाथ पेंढारकर, वय 52

वर्ष, धंदा मजुरी, राहणार हळी तालुका उदगीर.12) दामोदर नागोराव भांगे, वय 65 वर्ष, धंदा शेती, राहणार वाढवणा तालुका उदगीर.13) जमीर रफिक शेख, वय 29 वर्ष, धंदा मजुरी, राहणार हाळी तालुका उदगीर. 14) बालाजी नामदेव भंडरपे, वय 45 वर्ष, राहणार गादेवाडी तालुका अहमदपूर. 15) जलील मिरासाब शेख, वय 32 वर्ष, धंदा मजुरी, राहणार हाळी तालुका उदगीर.16)

विक्रम विनोद शिंदे, वय 23 वर्ष, धंदा मजुरी, राहणार हळी तालुका उदगीर. 17) शाहरुख शौकत चौधरी, वय 26 वर्ष, राहणार हंडरगुळी, तालुका उदगीर. 18) सोपान दिगंबर बंडेवाड, वय 47 वर्ष, कोळवाडी तालुका अहमदपूर. 19) नितीन विठ्ठलराव मुळे, वय 30 वर्ष, राहणार सुकणी तालुका उदगीर. 20) अनिल कमलाकरबाई कांबळे, वय 42 वर्ष, धंदा मजुरी, राहणार हाळी तालुका उदगीर.

यांच्यावर वाढवणा पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 76/2022 कलम 12 (अ) मुंबई जुगार कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य व रोख रक्कम असा एकूण 2 लाख 27 हजार 530 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस स्टेशन वाढवण्याचे पोलीस अमलदार सारोळे हे करीत

आहेत. हि कारवाई लातूर पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे अपर पोलीस अधीक्षक अनुराग जैन, यांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस अधिक्षक निकेतन कदम, परिविक्षाधीन पोलिस अधीक्षक अभयसिंह देशमुख यांचे नेतृत्वात त्यांच्या पथकातील पोलीस ठाणे वाढवणा येथील पोलीस अमलदार हाके, कलमे, शेख, रायभोळे, गोमारे, पुट्टेवाड, मामाडगे, पाटील यांनी केली.

Most Popular

To Top