राजकारण

बळीराजा शेतकरी विकास पॅनलचा मुगाव सोसायटी निवडणुकीत दणदणीत विजयी

महाराष्ट्र खाकी ( निलंगा / प्रशांत साळुंके ) – निलंगा तालुक्यात सध्या विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्यांच्या निवडणुका चालू असुन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस चे सरचिटणीस तथा लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अशोकराव पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक गावच्या सोसायटी निवडणुकीत त्यांच्या समर्थकांना शेतकऱ्यांनी बिनविरोध

व निवडणुकीतून निवडून दिले असुन निलंगा मतदारसंघात अशोकराव निलंगेकर यांचा सहकारात दबदबा कायम असल्याचे चित्र दिसून येत आहे.मुगाव विविध कार्यकारी सेवा सोसायटी ही अशोकराव निलंगेकर यांचे कट्टर समर्थक निटूर जिल्हा परिषदेचे सदस्या प्रतिनिधी सुरेंद्र धुमाळ नेतृत्वाखाली व जिल्हा बँकेचे वसुली व्यवस्थापक व्यंकटराव शिंदे यांच्या मार्गदर्शनात चालणारी सोसायटी

असल्याकारणाने या सोसायटीच्या निवडणुकीत विरोधी पक्षाने मोठी ताकत लावत निवडणुकीत चुरस निर्माण केली होती. परंतु राजकारण ना स्वार्थासाठी, ना स्वताहासाठी राजकारण फक्त गावच्या विकासासाठी या ब्रीद वाक्याप्रमाणे शेतकऱ्यात जाऊन शेतकऱ्याचा विश्वास संपादन करत दिनांक 18 मे 2022 रोजी झालेल्या निवडणुकीत सर्व च्या सर्व 13 जागा 50 ते 60 मताच्या

फरकाने जिंकत बळीराजा शेतकरी विकास पॅनल ने चुरशी लढतीत विजय मिळवला.यावेळी निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून आर बी सगर,सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून गटसचिव डी. डी. मरे,गटसचिव भीम कांबळे,गटसचिव गुरुदास पोतदार यांनी निवडणूक प्रक्रिया पार पाडली. मुगाव सोसायटी 2022 – 27 या वर्षीच्या पंचवार्षिक निवडणुकीत सर्वसाधारण मतदार

संघातून कमलाकर गोविंदराव शिंदे,रवि संदिपान कावळे, सुकुमार नामदेव धुमाळ,मारूती लक्ष्मण रकटाटे,गंगाधर भिमराव रूबदे,दाजीराम रंगराव वाडीकर, बालाजी माधवराव शिंदे, लायकपाशा लालअहमद शेख महिला राखीव मधून मुद्रिकाबाई विठ्ठल नागमोडे, बबीता युवराज पाटील भटक्या विमुक्त जाती/जमाती मधून संगीत बापुराव कोळेकर अनुसूचित जाती जमाती मधून अशोक खंडा

सुर्यवंशी इतर मागासवर्गीय प्रवर्गातुन विठ्ठल रूक्माजी वंटेकर हे 13 उमेदवार बहुमताने विजयी झाले. विजयी उमेदवाराचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सुरेंद्र धुमाळ, व्यंकटराव शिंदे,धनराज कोळेकर,युवराज पाटील,दत्ता शिरमाळे,सुग्रीव माने,योगेश कावळे,महमद शेख,मुजीब शेख,इस्माईल शेख,दिगंबर शिंदे,महेश वाडीकर,गंगाधर शिंदे,मुजीब सय्यद,नामदेव धुमाळ,योगेश शिंदे,मुक्तार शेख, बाळु नागमोडे,ब्रम्हा वाडीकर, बापुराव कोळेकर,हबीब शेख, चंद्रकांत महाळ,पूंडलिक वंटेकर, शाम रकटाटे,विठ्ठल रकटाटे आदी उपस्थित होते.

Most Popular

To Top