लातूरच्या राजकीय संस्कृतीचे दर्शन खासदार सुधाकर शृंगारे मुंबईला अमित देशमुखांच्या तिकिटावर गेले

महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) – लातूरचे खासदार सुधाकर शृंगारे हे खासदार म्हणून निवडून आल्यापासून लातूरकरांसाठी मोजकच वेळ दिला असे लातूरकर म्हणतात ! कोरोना काळात तर खासदार दिसलेच नाहीत असे अनेक वृत्तपत्रात छापून आले होते आणि जिल्ह्यात चर्चा होती. आता कुठे खासदार लातूर करांना दिसू लागले होते. लातूरकरांशी त्यांचा संबंध येत

होता कालच्या ईद निमित्ताने पालकमंत्री अमित देशमुख यांच्या सोबत ईदगाह मैदानावर दिसले आणि त्याच रात्री खासदार मुबंईला अमित देशमुख यांच्या तिकिटावर गेले. असे अमित देशमुख यांनी खुद्द एका कार्यक्रमात सांगितले. सविस्तर घटना अशी की अमित देशमुख यांना राज्य मत्रिमंडळ मिटिंग साठी 3 मे च्या रात्री मुबंईला जायचे होते पण मिटिंग रद्द झाल्यामुळे अमित देशमुख यांनी शिक्षक

आमदार विक्रम काळे यांच्या कार्यक्रमासाठी मुबंईचा नियोजित दौरा रद्द केला हि गोष्ट खासदारांना माहीती झाली!आणि खासदारांनी खुद्द स्वतःहून अमित देशमुख यांना त्यांचे मुबंईचे रेल्वेचे तिकीट मागून ते मुंबईला गेले असे अमित देशमुख यांनी सांगितले. आता यात गैर काहीच नाही यात कोनी गैरसमज करून घेऊ नये असेही

अमित देशमुख यांनी सांगितले आणि विरोधक असलेतरी एकमेकांना मदत केली पाहिजे आणि हि लातूरची राजकीय संस्कृती आहे असे सांगायला अमित देशमुख विसरले नाहीत.

Recent Posts