महाराष्ट्र खाकी ( निलंगा / प्रशांत साळुंके ) – महात्मा बसवेश्वरांनी बाराव्या शतकात अनुभव मंटप च्या माध्यमातून जगाला लोकशाहीची देणगी दिली आहे.स्त्री पुरुष समानता व सामाजिक समतेचा संदेशा सोबत महात्मा बसवेश्वरांनी श्रमाला प्रतिष्ठा मिळवून दिली असल्याचे प्रतिपादन माजी पालकमंञी तथा लोकप्रिय आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केले. निलंगा येथे
महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त अनुभव मंटप व महात्मा बसवेश्वर सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गुणीजनांचा सत्कार सोहळा व बसव व्याख्यानमालेत माजी पालकमंञी तथा लोकप्रिय आ.संभाजीराव पाटील निलंगेकर प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संगण बसव महास्वामीजी निलंगा हे होते. यावेळी बसव पिठावर माजी
नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, शिवसेनेचे उप जिल्हा प्रमुख विनोद आर्य,डाॅ.अरविंद भातांब्रे, व्याख्यानमालेचे मुख्य वक्ते प्रा. डॉ.राजशेखर सोलापुरे आदी उपस्थित होते.
“बसव विचारांची वर्तमानातील उपयुक्तता” या विषयावर बोलताना प्रमुख वक्ते डॉ. राजशेखर सोलापुरे म्हणाले की माणसाला माणूस बनवण्यासाठी बसव विचार आवश्यक असून काम करणाऱ्या माणसाला प्रतिष्ठा देण्याचे काम
बसवेश्वरांनी केले आहे. महात्मा बसवेश्वर इतिहासाचे गायक नव्हे तर नायक होते. देशाचा प्रधानमंत्री कसा असावा याचा आदर्श आपल्या आचार व विचारातून बसवेश्वरांनी जगासमोर मांडला आहे. देशात देवालय नाहीतर ग्रंथालयाची गरज असून माणसाला सक्षम बनवण्यासाठी बसवेश्वरांच्या वचन साहित्याची आवश्यकता आहे. लिंगायत धर्मात कोणत्या प्रकारचे
सुतक नाही. महात्मा बसवेश्वरांनी लिंगायत ओळख देऊन जाती संपले आहेत म्हणून आज जातीव्यवस्था नष्ट करण्यासाठी बसवण्याच्या विचाराची गरज आहे. नैतिक राजकारणाचा आदर्श निर्माण करण्याचे काम बसवेश्वरांनी केले असून आजची संसद बसवेश्वराच्या विचाराने काम केल्यास भारत महासत्ता होईल असे परखड मत त्यांनी याप्रसंगी व्यक्त केले. बसव पिठावरील प्रमुख अतिथींच्या हस्ते सामाजिक कार्यात स्वतःला झोकून देणाऱ्या रत्नेश्वर
गताटे व राजकुमार नीला शून्यातून विश्व निर्माण करणाऱे व्यापारी सिद्राम चाकोते, शिवप्रसाद मुळे, धनराज स्वामी, शिवकुमार नीला, शिवा मेंगले, बुद्धिवंत मुळे, प्रशांत सोरडे, शिवकुमार रुकारे , पिंटू फुलारी, प्रगतिशील शेतकरी प्रमोद धर्मशेट्टी, शैक्षणिक क्षेत्रातील प्रा. विश्वनाथ शेटकार, शासकीय सेवेत उच्च पदावर कार्यरत असणारे
अन्न व औषध विभागाचे सहाय्यक आयुक्त रुद्रमणी
पोंगळे, पतीच्या निधनानंतर कष्टाने संसार उभा करून पतीचा व्यापार सुस्थितीत आणणार्या श्रीमती शोभाताई सलगरे आदी गुणीजनांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीशैल बिराजदार यांनी केले. सूत्रसंचालन सुनील मुळे यांनी तर आभार डॉ.मन्मथ गताटे यांनी मानले. याप्रसंगी प्रल्हाद बाहेती, विलास सुर्यवंशी,
अजित माने, बाबुराव सूर्यवंशी ,धम्मानंद काळे,
अण्णासाहेब मिरगाळे, रजनीकांत कांबळे, रोहित बनसोडे, दत्ता शाहीर, ॲड. नारायण सोमवंशी, शेषेराव ममाळे, चक्रधर शेळके, रामलिंग पटसाळगे ,दयानंद चोपणे यांच्यासह बसव प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
