महाराष्ट्र

लातूर मनपा नळाला पिवळे दूषित पाणी सोडून लातूर च्या नागरिकांना पाण्याद्वारे एक प्रकारचे विष पाजत आहे! – अजित पाटील कव्हेकर

महाराष्ट्र खाकी (लातूर) – मागील एक महिन्या पासून लातूर च्या नागरिकांना दूषित हिरवे पिवळे पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारी मनपा प्रशासन आणि महापौर विक्रांत गोजमगुंडे यांच्या कडे येत होत्या आणि सोशल मीडियावर मनपाच्या आणि महापौरांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्तित केले जात आहे हे महापौरांना लक्ष्यात आल्यानंतर त्यानीं सोशल मीडियावर व्हिडीओ जाहीर

करून नळाचे पाणी पिऊन हे पिवळे हिरवे पाणी येणे बंद झाले आणि हे पाणी पिण्या योग्य आहे असे जाहीर केले. पण परत लातूरच्या काही भागात हिरवे – पिवळे पाणी यायला लागले. या गोष्टीवर नगरसेवक अजित पाटील कव्हेकर यांच्या मार्गदर्शनात भाजप युवा मोर्च्या तर्फे मनपा वर धडक मोर्च्या कडून पिवळे हिरवे पाणी जार मध्ये भरून आणले होते. या वेळी अजित पाटील कव्हेकर यांनी

मनपा पाणीपुरवठा पद्धतीवर, विक्रांत गोजमगुंडे आणि पालकमंत्री अमित देशमुख यांच्या कार्य पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्तित केले आहे. अजित पाटील कव्हेकर बोलताना म्हणाले की मनपा कडून लातूरच्या जनतेच्या जीवाशी खेळ चालू आहे. महापौर या गोष्टीकडे गांभीर्याने पाहत नाहीत . पालकमंत्री लातूरला फक्त पर्यटन म्हणून येत असतात. त्यानीं या अडचणीवर काहीच कार्यवाही केली

नाही. मनपा कडे पाणी तपासणी लॅब नसल्याचे दाखून दिले आहे.या दूषित पाणी पुरवठ्या मुळे अनेक नागरिक लहान मुले , वयोवृद्ध लोक आजारी पडले आहेत , याना एक महिना झाले आम्ही सातत्याने सांगत आहे तर हे मगरी चे कातडी परिधान केलेले सरकार नागरिकांच्या या महत्त्वाच्या प्रश्नाकडे पाहत नाही , हे लातूर च्या नागरिकांना पाण्याद्वारे एक प्रकारचे विष पाजत आहे. ते

आम्ही कदापि सहन करू शकत नाही या सत्ताधारी पक्षांना पाणी दूषित पुरवठा होत आहे हे माहित असून सुद्धा कोणतीही खबरदारी न घेता दूषित पाण्याचा पुरवठा करून लातूर शहरातील नागरिकांच्या आरोग्य खेळत आहे . यातून असे स्पष्ट होत आहे की या सातधारी पक्षाला जनतेचे काहीच देने घेणे नाही त्यांना असे वाटत आहे आपण काही केले तरी आम्हीच निवडून येणार हा जो

त्यांचा घमंड आहे तो या वेळेस जनता -जनार्धन परिवर्तनातून दाखवून देईल. अजित पाटील कव्हेकर यांनी अभ्यास पूर्ण हे पिवळे हिरवे पाणी पुरवठा होतो आणि हे काय केल्याने थांबेल याबद्दल माहिती दिली हे विशेष म्हणावे लागेल आणि त्यांच्या अभ्यासाचे लातूरकर कौतुक करत आहेत. या पिवळे हिरवे पाणी पुरवठ्या बद्दल कर्मच्याऱ्याणा दोषी ठरवले आहे. आणि चौकशीचे आदेश दिले आहेत असे महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी सांगितले आहेत.

 

Most Popular

To Top