विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स MIT , पुणे, भारत तर्फे रामेश्वर (रुई) येथे प्रभू श्रीराम जन्मसोहळा व ‘श्रीराम’ रथ यातत्रा संपन्न

महाराष्ट्र खाकी ( लातूर ) – विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे व रामेश्वर (रूई) ग्रामस्थांच्या वतीने रामेश्वर (रुई ), ता. जि. लातूर येथे चैत्र शुध्द 9, रामनवमी, रविवार, दि. 10 एप्रिल 2022 रोजी सकाळी ठीक 8.15 वाजता भारतीय संस्कृती, परंपरा, तत्त्वज्ञान, त्याग आणि समर्पणाचे मूर्तीमंत प्रतीक, तसेच, समस्त भारतीयांचे श्रध्दास्थान असलेल्या मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम जन्मसोहळ्याच्या निमित्ताने सर्वधर्मसमभावाचे प्रतीक असलेले भारतीय संस्कृती दर्शन – ‘श्रीराम’ रथ यात्रा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते .

भारतीय संस्कृती दर्शन – श्रीराम रथ यात्रा सोहळ्यास महान तत्त्वज्ञ, विचारवंत, बौध्द धर्माचे गाढे अभ्यासक डॉ.भदंत राहुल बोधी महाथेरो व जगप्रसिध्द शास्त्रज्ञ डॉ. विजयकुमार दास हे सन्माननीय प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते .

शनिवार, दि. 9 एप्रिल 2022 रोजी ह.भ.प. बजरंग महाराज फड यांचे कीर्तन असेल. पूर्णब्रह्मयोगिनी त्यागमूर्ती श्रीमती प्रयागअक्का दादाराव कराड यांनी श्रीराम मंदिरास अर्पण केलेल्या सुंदर, रेखीव व वैशिष्ट्यपूर्ण अशा भारतीय संस्कृती दर्शन- श्रीराम रथाची, मानवतातीर्थ म्हणून साकार झालेल्या रामेश्वर गावची ग्रामप्रदक्षिणा सकाळी 8.15 वा. निघेल. या रथ यात्रेनंतर सकाळी 10 वाजता ह.भ.प. श्री. बालयोगी हरिहर महाराज दिवेगावकर (बनकरंजा, ता. केज) यांचे काल्याचे कीर्तन होऊन महाप्रसादाचे वाटप केले .

रामेश्वर (रुई), ता. जि. लातूर या गावी, हिंदू-मुस्लिम व इतर सर्व धर्मियांच्या परस्पर सहकार्यातून उभारण्यात आलेले अत्यंत सुंदर व देखणे श्री राम मंदिर, हजरत जैनुद्दीन चिस्ती दर्गा व जामा मस्जिद हे रामेश्वर (रुई) गावातील ‘हिंदू-मुस्लिम ऐक्याचे व राष्ट्रीय एकात्मतेचे’ एक मूर्तिमंत प्रतीक आणि खर्या अर्थाने ज्ञानकेंद्र म्हणून उदयास येत आहे, सदरील श्रीराम रथ यात्रेचे मुस्लिम बांधवांकडूनही स्वागत केले .

श्री राम मंदिराबरोबरच, सोनावळा नदीचे तीरावरील दक्षिणेस असलेले श्री गोपाळबुवा महाराजांचे मंदिर, उत्तरेस असणारा हजरत जैनुद्दीन चिस्ती दर्गा व जामा मस्जिद, ‘विश्वधर्मी श्रीराम-रहीम मानवता सेतू’ व तथागत भगवान गौतम बुध्द विहार व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती विश्वशांती भवनाची भेट हाही एक चांगला अंतर्मुख करणारा अनुभव असेल. म्हणूनच रामेश्वर (रूई) हे गाव मानवतातीर्थ म्हणून ओळखले जात आहे .

रामेश्वर (रुई) गावच्या पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी या भारतीय संस्कृती दर्शन – श्रीराम रथ यात्रेमध्ये सहभागी होऊन श्रीराम रथ सोहळ्याची दैवी अनुभूती घेतली ,

Recent Posts