महाराष्ट्र खाकी ( लातूर ) – भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती यावर्षी उत्साहात साजरी करण्यात येत आहे. माझं लातूर परिवाराच्या वतीने शहरातील माध्यमिक विद्यालयांना भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे तैलचित्र मोफत भेट देण्यात येणार आहे.
जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून मान सन्मान असलेला आपला देश संविधानामुळे यशस्वीपणे वाटचाल करीत आहे. या संविधानाप्रती विद्यार्थ्यांमध्ये आदर, आपुलकी निर्माण झाली पाहिजे, बालमनात संविधानाची वैशिष्ट्ये रुजविली जावी या उदात्त हेतूने हा अनोखा,
दिशादर्शक आणि अनुकरणीय उपक्रम माझं लातूर परिवाराच्या वतीने हाती घेण्यात आला आहे. ही उद्देशिका शाळेतील दर्शनी भागात लावण्यात यावी अशी विनंती सर्व संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक यांना माझं लातूरच्या वतीने करण्यात येत आहे. येत्या 13 आणि 14 एप्रिल रोजी संविधान उद्देशिकेचे वितरण करण्यात येणार आहे.
