निलंगा येथिल हजरत दादापीर दर्गा उर्स समारोह संपन्न. मा खा डॉ सुनील गायकवाड़ यांची प्रमुख उपस्थिति.

महाराष्ट्र खाकी ( निलंगा ) – निलंगा येथिल हिंदू मुस्लिम एक्येचे प्रतिक असलेले देवस्थान हजरत दादापीर दर्गा शरीफ यांच्या 410 व्या उर्स निमित्ताने आज कोरोनाच्या नियमांचे पालन करत उर्स कार्यक्रमाची लातूर चे माज़ी ख़ासदार प्रोफ़ेसर डॉ सुनील बलिराम गायकवाड़ राष्ट्रीय अध्यक्ष विश्व दलित परिषद आणि अनेक मान्यवर सर्व पक्षिय नेते सामाजिक कार्यकर्ता यांच्या प्रमुख उपस्थितीत सांगता करण्यात आली.त्यामध्ये विशेषतः दर्गा हजरत दादापीर चे सज्जादा नशीन सय्यद करीमउल्लाह नबीरा खादरी यांच्या अध्यक्षतेखाली सर्व पाहुन्याचा दर्गा समिती च्या वतींने सत्कार करण्यात आला.

या दर्गा बद्दल या भागात असि ख्याती आहे की शुभ हे देवस्थान मध्ये आपल्या आसता,मनोकामना ईच्छा घेऊन अनेक राजकीय सामाजिक मंडळी येतात माथा टेकवून प्रार्थना करतात आणि काही काळातच ते सुख,समृद्धी मिळवतात.याचा अनुभव अनेकांनी घेतला आहे…

हजरत दादापीर दर्गा देवस्थान च्या उर्स समारोह कार्यक्रमात लातूर चे माज़ी ख़ासदार संसद रत्न प्रोफ़ेसर डॉ सुनील बलिराम गायकवाड़,निलंगा पंचायत समितीचे माजी सभापती आणि निलंगा विधानसभेचे भावी आमदार अजित माने ,भावी आमदार अभय साळुंके ,भावी आमदार पंडितराव धूमाळ ,भावी आमदार अशोक पाटील निलंगेकर ,माज़ी नगराध्यक्ष हामिद भाई,प्रा.दयानंद चोपने,यांनी दर्शन घेतले… यावेळी अनेकजण उपस्थित होते कोरोनाचे नियमानुसार उर्स निमित्त यात्रा महोत्सव रद्द करून ते सामाजिक कार्यक्रम या ठिकाणी केले आहेत..

Recent Posts