महाराष्ट्र

वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुखांचा “दिव्या खाली अंधार” कारभार याचे उत्तम उदाहरण म्हणजे प्रशासकीय सेवेत असलेल्या डॉक्टरांच्या लातूर शहरातील प्रायव्हेट हॉस्पिटल्स

महाराष्ट्र खाकी (लातूर) – लातूर मधील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अनेक डॉक्टर लेक्चरर वेगवेगळ्या विभागात कार्यरत आहेत. प्रशासन त्यानां त्याचा मोबदला म्हणून मोठ्या रकमेच्या पगारी देते . प्रशासकीय सेवेत रुजू होताना काही नियम असतात काही डॉक्टर हे नियम पाळतात तर काही डॉक्टर हे नियम पायदळी तुडवत आहेत म्हणजे नियम मोडत आहेत .

नियम मोडणाऱ्या डॉक्टर मधील एक डॉक्टर म्हणजे डॉ. मनोज कदम हे विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात क्षयरोग विभागात कार्यरत आहेत. त्यानां मोठी पगारही मोळतो तरी डॉ. मनोज कदम यांनी बाहेर अपोलो हॉस्पिटल आहे. आणि या हॉस्पिटल मध्ये वैद्यकीय महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यपक म्हणून कार्यरत असलेले डॉ अभिजित एम यादव यांची OPD जोरात चालू आहे आणि प्रशासनाची फसवणूक ही चालू आहे असे म्हणावे लागेल . 2016 मध्ये एका सामाजिक संघटनेने या बद्दल जिल्हाधिकारी आणि वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाकडे तक्रार केली होती तरी देखील या घटनेवर कोणीही कसलीही कारवाई केली नाही. म्हणजे प्रशासन या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

डॉ. मनोज कदम यांचे वैद्यकीय शिक्षण हे MBBS, TDD आहे. पण डॉ. मनोज कदम यांनी DM डिग्री पण दाखवतात पण त्यांच्या कडे असलेली MD डिग्री ही खोटी असल्याची तक्रार 2016 मध्ये एका संघटनेने केली होती. आणि याबद्दल गांधी चौक पोलिस स्टेशनला चोकशीचे आदेश प्रशासनाने दिले होते या नंतरही काही कारवाई किंवा चोकशी समोर आली नाही.

या सर्व गोष्टीवरून जिल्ह्याचे पालकमंत्री आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री असलेले अमित देशमुख यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्तित होत आहे कारण राज्यात अमित देशमुख यांचे कार्य पाहता एकदम नेटका कारभार केला आहे. पण स्वतःच्या मतदारसंघात मात्र दुर्लक्ष केला की काय असा प्रश्न उपस्तित झाला आहे. हे म्हणजे असे झाले, “दिव्या खाली अंधार” म्हणजे राज्यत काम चांगले पण स्वतःच्या मतदार संघात नियम मोडण्यास खुली सुट. आता तरी या प्रकरणावर वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी लक्ष घालून असे प्रकार थांबवावेत आणि पुन्हा होणार नाही या साठी कडक कारवाई करावी असे जनतेतून आणि वैद्यकीय क्षेत्रातून मागणी होत आहे.

Most Popular

To Top