देश

अल्ट्रा हाय परफॉर्मन्स फायबर रिइन्फॉर्सड नवतंत्राज्ञान वापरून देशातील पहिला पूल लातूर जिल्ह्यात

महाराष्ट्र खाकी ( लातूर ) जे नव ते लातूरला हव या नुसार लातूरचे सर्व पक्षीय नेते मंडळी प्रयत्नशील आहेत. लातूर – निलंगा या रस्त्यावर मसलगा येथे ” अल्ट्रा हाय परफॉर्मन्स फायबर रिइन्फॉर्सड ” ( UHPFRC ) या नवतंत्राज्ञानाने पर्यावरणपूरक नावीन्यपूर्ण पूल बांधला आहे.

त्याची पाहणी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली. त्यावेळी त्यांच्या समवेत राज्याचेपर्यावरण, पाणी पुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), रोजगार हमी राज्यमंत्री संजय बनसोडे, आ. विक्रम काळे उपस्थित होते.

पुला बद्दल थोडक्यात माहिती
पारंपारिक पूल बांधताना 30 मीटर अंतरावर पिलर बांधले जातात अल्ट्रा हाय परफॉर्मन्स फायबर रिइन्फॉर्सड या तंत्रज्ञानात 120 मीटर अंतरावर पिलर बांधले आहेत. M 40 या पारंपरिक पद्धतीपेक्षा हा पूल 4 पटीने मजबूत आहे. नेहमीच्या पुला पेक्षा 30 ते 35 टक्के एवढा हा वजनाने हलका आहे.

हा पूल बघितल्या नंतर देशभर आपण असेच पूल बांधणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले. यावेळी या पूल बांधकामातील अभियंते, सहायक अभियंते, कंत्राटदार, प्रत्यक्ष काम करणारे कामगार यांचे गडकरी यांनी कौतुक केले.

Most Popular

To Top