महाराष्ट्र खाकी (लातूर) – लातूर शहर महानगरपालिकेचा महापौर म्हणून विक्रांत गोजमगुंडे यांचा दोन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी लातूर शहरात अनेक विकासकामे मार्गी लावत ‘स्मार्ट लातूर’ च्या दृष्टीने काही महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत आणि घेत आहेत. कोरोनाच्या कठीण काळात महापौर विक्रांत गोजमगुंडे यांच्या मार्गदर्शनात लातूर मनपाने उत्कृष्ट कार्य केले या कार्यात लातूर मनपा आरोग्य विभागाचे खूप महत्वाचे योगदान होते,
याच आरोग्य विभागातील मानधन तत्वावर 31 आरोग्य कर्मचाऱ्यांना लातूर मनपा मध्ये कायम सेवेत घेण्याचा निर्णय राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. राज्य सरकार कडे या साठी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी पाठपुरावा केला होता आता या पाठपुराव्याला यश आले आहे. या 31 आरोग्य कर्मचाऱ्यामध्ये 3 डॉक्टर,25 नर्स आणि 3 डाटा एन्ट्री ऑपरेटर आहेत. या सर्वांनी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांचे आभार वेक्त केले आहेत. आणि महापौराणी पालकमंत्री अमित देशमुख यांचे आभार मानले.