महाराष्ट्र

केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचा दोन दिवस लातूर जिल्हा दौरा विविध कार्यक्रम

  महाराष्ट्र खाकी ( लातूर )- केंद्रीय रस्‍ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी हे दोन दिवसाच्‍या लातूर जिल्‍हा  दौऱ्यावर येत आहेत. या निमित्‍ताने त्‍यांच्‍या हस्‍ते जिल्‍हयातील विविध दोन हजार कोटी रूपये खर्चाच्‍या विकास कामाचा भुमिपूजन आणि लोकार्पण सोहळा होत असून दि. 25 नोव्‍हेंबर 2021 गुरूवार रोजी सायं 4 वाजता लातूर येथील टॉऊन हॉल मैदानावर आयोजित जाहिर कार्यक्रमास सर्व स्‍तरातील नागरीकांनी हजारोंच्‍या संख्‍येनी उपस्थित रहावे असे आवाहन भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष आ. रमेशअप्‍पा कराड यांनी केले आहे.

केंद्रीय रस्‍ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांचा दि. 25 आणि 26 नोव्‍हेंबर या दोन दिवसाचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.

दि. 25 नोव्‍हेंबर 2021 रोजी सकाळी 10.30 वा. नागपूर येथून लातूर विमानतळ येथे आगमन. सकाळी 11 वा. विवेकानंद मेडीकल फाऊंडेशन आयोजीत कार्यक्रमास एमआयडीसी लातूर येथे उपस्थिती. दुपारी 1.30 वा.लोदगा ता. औसा कडे रवाना. दुपारी 2 वा. ड्रायव्‍हींग ट्रेनिंग सेंटरचे उद्धाटन, लोदगा ता. औसा. दुपारी 3.30 वा. मसलगाकडे रवाना, दुपारी 4 वा. मसलगा पुलाची पाहणी, दुपारी 4.30 वा. लातूरकडे रवाना,

विविध कामाचे भुमीपूजन व लोकार्पण सोहळा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क, टाऊन हॉल, लातूर. सायं 5.45 वा. स्‍वंयसिंध्‍दा महिला मंडळाच्‍या कार्यक्रमास एमआयडीसी, लातूर येथे उपस्थिती. सायं 6.30 वा. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्‍या कार्यक्रमास छत्रपती शाहू महाराज विद्यालय, लातूर येथे उपस्थित. संध्‍या 7.15 वा. मा आ रमेश अप्पा कराड यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट. संध्‍या 7.45 वा. मा.खा. सुधाकर शृंगारे यांच्‍या निवासस्‍थानी सदिच्‍छा भेट.

संध्‍या 8.15 वा. हॉटेल न्‍यु गंधर्व गार्डन चे उद्धाटन, औसा रोड, लातूर. संध्‍या 8.45 वा. मा.आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्‍या निवासस्‍थानी भेट व लातूर येथे मुक्‍काम. दि. 26 नोव्‍हेंबर 2021 रोजीचा दौरा सकाळी 7.30 वा. मा.आ. अभिमन्‍यू पवार यांच्‍या निवासस्‍थानी सदिच्‍छा भेट. सकाळी 8.00 वा. लातूर विमानतळाकडे प्रयाण आणि सकाळी 8.15 वा. लातूर येथून दिल्‍लीकडे रवाना अशी माहिती भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष रमेशअप्‍पा कराड यांनी दिली आहे.

Most Popular

To Top