महाराष्ट्र

लातूर – टेंभुर्णी रस्त्याच्या कामाचे खरे श्रेय माजी खासदार डॉ. सुनील गायकवाड यांचेच

महाराष्ट्र खाकी (लातूर) – लातूर जिल्हा विकासात बऱ्याच नेते मंडळींचा हात आहे. आणि लातूरचा विकास होत आहे. पण बऱ्याच वर्षांपासून लातूरकरांना पुण्याला जाण्यासाठी रस्त्याचा त्रास होयचा कारण लातूर पासून ते टेंभुर्णी पर्यंतचा रस्ता खूप खराब होता. आता या रस्त्याचे काम चालू झाले आहे.

या कामासाठी लातूर चे माजी खासदार डॉ सुनील गायकवाड यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. डॉ सुनील गायकवाड यांनी जानेवारी 2018 च्या लोकसभा अधिवेशनात टेंभुर्णी ते लातूर हा राज्य महामार्ग, राष्ट्रीय महामार्गात परिवर्तन करून लवकरात लवकर महामार्गाचे काम सुरू करावे, अशी मागणी केली होती.

त्यानंतर त्यांनी यासाठी नितीन गडकरी यांच्या कडे सतत पाठपुरावा केला होता. आता त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून टेंभुर्णी – लातूर महामार्गाच्या कामाला सुरुवात झाली आहे.

माजी खासदार डॉ सुनील गायकवाड यांनी  माहिती दिली आहे. त्यांनी टेंभुर्णी ते लातूर महामार्गाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचे महाराष्ट्र चे तत्कालीन सचिव अनिलकुमार बळीराम गायकवाड यांचे जाहीर आभार मानले आहेत.


या महामार्गामुळे मुंबई, पुण्याहून लातूर, नांदेडकडे जाणाऱ्या प्रवाश्यांना खूप सोयीचे होणार आहे. हा प्रश्न मार्गी लागल्यामुळे अनेकजणांनी माजी खासदार डॉ गायकवाड यांचे आभार मानले आहेत.

Most Popular

To Top