महाराष्ट्र

आमदार अभिमन्यू पवार यांच्या पदयात्रेत युवा नेतृत्व अजित पाटील कव्हेकर सहभागी

महाराष्ट्र खाकी (लातूर) – लातूर जिल्ह्यात भाजपची युवा शक्ती वाढवण्याचे काम अजित पाटील कव्हेकर यांनी हातात घेतल्यापासून लातूर भाजपात युवा वर्ग मोठ्या प्रमाणात दिसत आहे. अजित पाटील कव्हेकर यांना मानणारा मोठा युवा वर्ग आहे याची झाजक 72 तास अन्नत्याग आंदोलनात दिसून आली होती. आता हिच युवा शक्ती म्हणजे अजित पाटील कव्हेकर यांनी मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या व्यथांना वाचा फोडण्यासाठी आमदार अभिमन्यु पवार यांच्या नेतृत्वाखाली औसा ते तुळजापूर पदयात्रा काढण्यात येत आहे. शेतकऱ्यांची व्यथा राज्य सरकारकडे पोहचवण्याचा प्रयत्न या पदयात्रेच्या माध्यमातून करत आहेत. या पदयात्रेत सहभागी होत आमदार अभिमन्यु पवार यांना पाठींबा दिला. मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यात अतिवृष्टी व ढगफुटीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना लवकरात लवकर भरघोस मदत करत शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.
पदयात्रेत देवीदास काळे , अनंत गायकवाड , अमोल निडवदे , रागिणी ताई यादव , घोरपडे ताई, गाडेकर ताई जी, शोभा ताई पाटील जी, लोंढे ताई जी, गजेंद बोकन जी, पंकज देशपाडे जी, सुनिल राठी जी, गोविंद सूर्यवंशी जी, संतोष तिवारी जी, किशोर शिंदे जी, यशवंत कदम जी, तसेच भाजपचे स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Most Popular

To Top