देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि संभाजी पाटील निलंगेकर पालकमंत्री पदासाठी अतृप्तआत्मे आहेत – शिवाजीराव माने शिवसेना लातूर जिल्हा प्रमुख

महाराष्ट्र खाकी (लातूर) – उत्तर प्रदेशमधील लखीमपुर खीरी येथे संसक्‍त किसान मोर्चाच्या नेतृत्वाखाली तीन केंद्रीय काळे कायदे रद्द करावेत, किफायतीशीर आधारभावाला केंद्रोय कायदा करावा, कामगारांवर अन्याय करणाऱ्या चार कामगार संहिता रद्द कराव्यात या मागण्यांसाठी गेली 10 महिन्यांपासून सुरु असलेल्या आंदोलनाचा भाग म्हणून शेतकरी आंदोलन करत असतान! केंद्रीय गरहराज्य मंत्री अजय मिश्रा टेनी यांच्या मुलाने व त्याच्या सहकाऱ्याने गाड्यांच्या ताफ्याने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना चिरडुन ठार मारले. या निघृण घटनेत 12 पेक्षा जास्त शेतकऱ्यांना भर रस्त्यात गाड्याखाली चिरडण्यात आले. मंत्र्याच्या मुलाने शेतकऱ्याला गोळ्या घालून मारले. भारतीय शेतकरी आंदोलनाच्या इतिहासातील ही अत्यंत काळीकुट्ट घटना आहे. याचा निषेध महाविकास आघाडी, किसान कामगार समन्वय समिती तीव्र शब्दात करते. केंद्रीय गरहराज्य मंत्री अजय मिश्रा टेनी यांना तात्काळ मंत्री पदावरुन बडतर्फ करावे तसेच त्यांचा मुलगा आशिष मिश्रा टेनी यास अटक करावी यासाठी आणि निघृण हत्येच्या निषेधार्थ 11 ऑक्टोबर सोमवार रोजी पुकारण्यात आलेला महाराष्ट्र बंदच्या अनुषंगाने लातूर मध्ये महाविकास आघाडीच्या घटक पक्षाच्या प्रतिनिधिनी पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र बंद च्या दिवशी लातूर जिल्ह्यात बंद कसा असेल याबद्दल माहीती दिली या पत्रकार परिषदेला काँगेस चे Adv. किरण जाधव, राष्ट्रवादी चे प्रशांत पाटील, शिवसेनेचे शिवाजीराव माने, भाई उदय गवारे आदी उपस्तित होते. पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देतात शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शिवाजीराव माने यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्यावर शिवसेना स्टाईलने टिका केले शिवाजीराव माने यांनी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आणि संभाजीराव पाटील निलंगेकर पालकमंत्री होण्यासाठी दोघे अतृप्तआत्मे आहेत असे म्हणाले पुढे बोलताना ते म्हणालेकी राज्यात अतिपावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी सरकारकडे मदत मागत आहेत त्यानां महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची इतकी काळजी आहेतर दिल्लीत उपोषणाला बसलेल्या आणि उत्तर प्रदेशमधील लखीमपुर खीरी येथे झालेल्या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांसाठी पण केंद्र सरकारला जाब का विचारत नाहीत असे शिवाजीराव माने म्हणाले.

Recent Posts