महाराष्ट्र खाकी (लातूर) – लातूर जिल्हा आणि खासकरून शहरातील गुन्हेगारी कमी होण्यात LCB चा मोठा सहभाग आहे. LCB कडून सारखीच कुठेना कुठे कारवाई करत असतेच अशीच एक कारवाई LCB पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांच्या नेतृत्वात लातूर शहरातील रामजी नगर भागात कारवाई केली.लातूर येथे राहणारे दोन इसम विनापासपरवाना गावठी पिस्टल बाळगुन आहेत व ते थोड्याच वेळात जुना रेणापूर नाका कडून MIDC रोडने त्यांचे कार मधून जाणार आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाली. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB)पथकाने सुभेदार रामजी नगर कडे जाणाऱ्या रोडवर एका चहाच्या हॉटेल जवळ सापळा लावला. थोड्याच वेळात बातमी प्रमाणे एक टाटा विस्टा कार क्रमांक MH.17 AG 5547 ही जुना रेणापूर नाका कडून येताना दिसली. त्या कारला सापळयातील पोलीस अंमलदारांनी हात करून थांबविले व कार मधील दोन इसमांना कारच्या खाली उतरवून त्यांना बाजूस घेऊन त्यांचे नाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव 1) सद्दाम बडेसाब शेख, वय 20 वर्ष, राहणार-सूळ नगर,इंडिया नगर, लातूर. 2) मोहम्मद खलील मोहम्मद हुसेन शेख, वय 28 वर्ष, राहणार- हुसेन कॉलनी, इंडिया नगर, लातूर.
असे असल्याचे सांगून पथकाने त्यांच्या ताब्यातील कारची झडती घेतली असता कारचे डॅशबोर्डच्या कप्प्यात एक गावठी पिस्टल व त्यामधील मॅक्झिन मध्ये मध्ये चार जिवंत काडतूस व एक पिस्टल सारखे दिसणारे लाइटर मिळून आले. ताब्यात घेण्यात आलेल्या इसमांना त्यांनी बाळगलेल्या पिस्टल च्या परवाना बाबत विचारपूस केली असता त्याने कसल्याही प्रकारचा परवाना नसल्याचे सांगितले. त्यावरून सदर इसमांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून सदरचा मुद्देमाल आणि नमूद कार पोलिसांनी जप्त केली आहे.अधिक विचारपूस केल्यानंतर सदर आरोपी क्रमांक एक याने त्याच्या इतर साथीदारांसह एमआयडीसी लातूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पोकलेन मशीन चे ब्रेकर चोरल्याचे तसेच बार्शी रोडवर घरफोडी केल्याची कबुली दिलेली आहे अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार माधव बिल्लापट्टे पोलीस नाईक बक्कल नंबर 902 यांच्या फिर्याद वरून एमआयडीसी लातूर येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे (LCB)पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांचे नेतृत्वात पोलीस अंमलदार अंगद कोतवाड, माधव बिल्लापट्टे, राम गवारे, संपत फड, राजू मस्के, नितीन कठारे, जमीर शेख यांनी सहभाग घेतला होता.