लातूर जिल्हा

लातूरकरांना मिळणार आठवड्यातून दोन वेळा पाणी – महापौर विक्रांत गोजमगुंडे

महाराष्ट्र खाकी (लातूर) – लातूर शहराच्या पाण्याचा प्रश्न बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित आहे. लातूर शहरास पाणी पुरवठा करणारे धरण धनेगाव मांजरा पूर्ण क्षमतेने भरले आहे. आणि लातूर शहर महानगरपालिकेवर महापौर म्हणून विक्रांत गोजमगुंडे यांनी सूत्र हातात घेतल्यापासून लातूर शहरात अनेक कौतुकास्पद उपक्रम राबवले आहेत आणि लोकांनी त्या उपक्रमास सकारात्मक प्रतिसाद दिला आणि कौतुक ही केले. तसेच विक्रांत गोजमगुंडे हे महापौर होण्याच्या अगोदर लातूर शहरास 10 ते 15 दिवसाला पाणी यायचे पण नंतर विक्रांत गोजमगुंडे यांच्या नियोजनात कमालीचा बदल लातूरकरांना दिसून आला आठ दिवसाला पाणी मिळू लागले आणि आता लातूरकरांना आठ दिवसातून दोनदा पाणी देण्याचे नियोजन महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी केले आहे.लातूर शहरास आठवड्यातून दोन वेळा पाणी पुरवठा करण्याचे निर्देश प्रशासनास देण्यात आले आहेत. प्रशासनाकडून येत्या दोन दिवसात नवीन वेळापत्रक सादर केल्यानंतर लातूरकरांना आठवड्यातून दोन वेळा पाणी देण्यास प्रायोगिक तत्त्वावर सुरुवात करण्यात येईल. शहरातील अंतर्गत जलवाहिनी नेटवर्क अधिक सक्षम करणे आवश्यक असून त्याबाबतही पावले उचलली जात आहेत असे महापौर विक्रांत गोजमगुंडे म्हणाले.

Most Popular

To Top