महाराष्ट्र खाकी ( लातूर ) – महाराष्ट्राच्या राजकारणात लातूरचे स्थान मोठे आणि महत्वाचे आहे. लातूर जिल्ह्यात अनेक नेते आहेत जे राज्याच्या राजकारणात सक्रीय असतात मग ते देशमुख परिवार, निलंगेकर परिवार, चाकूरकर परिवार असे अनेक नेते मंडळी आहेत. पण देशमुख परिवाराचे खूप मोठे योगदान आहे. आधी विलासराव देशमुख होते आणि आता अमित देशमुख आहेत. विलासराव देशमुख यांच्या काळात लातूर मधून त्यांच्यावर आरोप व्हायचे पण कामाच्या बाबतीत, पण अमित देशमुख यांच्या कामावर आणि त्यांच्या ताकतीवर आणि कर्तृत्वावर होत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तोंडावर आहेत. त्याची मोर्चेबांधणी प्रत्यक पक्ष करत आहे. त्यात राष्ट्रवादी पण करत आहे त्याच निमित्ताने निलंगा येथे राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे अल्पसंख्यांक मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात आमदार बाबासाहेब पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश कार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांनी अमित देशमुख यांच्यावर टिका केली.
सुरज चव्हाण यांनी अमित देशमुख हे शरद पवार यांच्या मुळे मंत्री आणि पालकमंत्री झाले आहेत हे विसरू नये !असे म्हणाले. दुसरीकडे भाजप युवा मोर्च्या च्या प्रदेश सचिव प्रेरणा होनराव यांनी काही दिवसापूर्वी लातूरच्या कोरोना लसीकरणात लातूरच्या लोकांना दुसऱ्या डोस बद्दल अनेक प्रश्न उपस्तित केले आहेत आणि पालकमंत्री अमित देशमुख यांच्या राजकीय वजनावर टिका केली होती. प्रेरणा होनराव अस म्हणाल्या की केंद्र सरकार राज्य सरकारला व्हॅक्सीन देत आहे. आणि प्रत्येक पालकमंत्री, नेता आपल्या जिल्ह्याला जास्त व्हॅक्सीन मिळाव्यात म्हणून आपले वजन वापरून ज्यास्त व्हॅक्सीन आणत आहेत आणि पालकमंत्री अमित देशमुख काहीच करत नाहीत. एकतर अमित देशमुखांनी लातूरच्या जनतेला गृहीत धरले असावे किंवा पालकमंत्री अमित देशमुख यांचे राज्यात वजन कमी असावे असे प्रेरणा होनराव म्हणाल्या.
लातूर मध्ये पहिल्यांदाच दोन पक्षाच्या युवा आघाडीच्या पधादिकाऱ्यांनी असे आरोप केले आहेत. यातून अनेक प्रश्न निर्माण होत आहेत, लातूरचा युवा वर्ग पालकमंत्री अमित देशमुख यांच्या कामावर नाराज आहे का? इतके आरोप होऊन ही लातूर युवा काँगेस कडून काहीच प्रतिक्रिया दिसून येत नाही ? खरच अमित देशमुख यांचे राज्यात वजन कमी आहे का ? अमित देशमुख यांच्या वर टिका का होत आहेत ?