महाराष्ट्र

गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी गर्दी झाल्यास दुसऱ्या दिवसापासून कडक नियम लावणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

महाराष्ट्र खाकी ( पुणे ) – कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे राज्यात सरकारकडून जनतेला अवाहन करण्यात येत आहे. पुण्यात गणेशोत्सव खूप मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.येणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहाहारत कुठलेही नवे निर्बंध लावणार नाही. पण गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी जर गर्दी होत आहे असं लक्षात आल्यास दुसऱ्या दिवसापासून लागलीच कडक निर्बंध लावण्यात येतील असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे . पुण्यात कोरोना आढाव बैठकीनंर ते पत्रकारांशी बोलत होते. राज्यात ग्रामीण भागात कोरोना नसल्यासारखं लोक वागू लागले आहेत. लोकांनी काळजी घेण्याची गरज असल्याचंही अजित पवार यावेळी म्हणाले . लसीकरणात महाराष्ट्र अग्रेसर आहे. पण अजून अनेक लोकांचे लसीकरण झाले नाही. राज्याकडून जास्तीत जास्त लसीकरण वाढवण्यावर भर दिला जात आहे अस अजित पवार यावेळी म्हणाले आहेत.

Most Popular

To Top